हॉलिवूड स्टार विल स्मिथचे जगभरात लाखो चाहते आहेत. आजवर अनेकांनी त्याला हॉलिवूड सिनेमांमध्ये अॅक्शन आणि स्टंट करताना पाहिलं असेल. पण नुकतच विलने असं काही केलंय जे पाहून कुणालाही धडकी भरेल. जगातील सर्वात उंच इमारत म्हणजेच दुबईतील गंगनचुंबी बुर्ज खलिफाच्या टोकावर जाऊन विलने काही फोटो काढले आहेत. एका यूट्यूब सीरिजसाठी विल बुर्ज खलिफाच्या टॉपवर गेला होता.
विल स्मिथचा हा व्हिडीओ आणि बुर्ज खलिफाच्या टॉफवरील त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. १६० मजल्यांची ही इमारत २,७२२ फूट उंच आहे आणि या गंगनचुंबी इमारतीच्या टोकावर जाण्याचं धाडस विल स्मिथने केलंय. विलने युट्यूब शो ‘बेस्ट शेप ऑफ माय लाईफ’च्या एका एपिसोडसाठी बुर्ज खलिफाच्या टॉपवर जात तिथले काही फोटो आणि व्हिजीओ शेअर केलाय.
‘जबडा तुटेल पण अर्थ समजणार नाही…’, जेव्हा बिग बी हिंदी बोलताना अडखळले
या व्हिडीओत विल बुर्ज खलिफाच्या टॉपवर जाण्यासाठी तयारी करताना दिसतोय. त्यानंतर हजारो फूट उंच टोकावर पोहल्यावर त्याने तिथे उभं राहत फोटोही काढले आहेत.
तसचं ड्रोनच्या मदतीने विलचे काही फोटो काढण्यात आले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. विलचं हे धाडस पाहून त्याचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत.