श्रेयस तळपदे सूत्रसंचालन करत असलेल्या पहिल्या वहिल्या मराठी थरार निर्माण करणा-या ‘झुंज मराठमोळी’ या रिअॅलिटी शोमध्ये दोन नव्या लढवय्यांचा प्रवेश होणार आहे. यात पुष्कर जोग आणि नेहा शेवाळे या कलाकारांचा प्रवेश सोमवारच्या भागात होईल. यावर लोकसत्ताने त्यांच्याशी संपर्क साधला असता दोघांनीही आपण झुंजसाठी फार उत्सुक असल्याचे सांगितले.

“मला अॅक्शन करायला खूप आवडतं. मी ‘जबरदस्त’ चित्रपटात अॅक्शन रोल केला होता. पण तो चित्रपट असल्यामुळे साहसी दृश्ये करण्यासाठी मी केलेली मेहनत त्यामागची धडपड ही कोणालाच दिसली नाही. मात्र, झुंजच्या निमित्ताने मला साहसी दृश्ये दाखविण्याची संधी मिळणार असल्याचे,” अभिनेता पुष्कर जोगने म्हटले. ‘तू तिथे मी’ मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहचलेला चेहरा म्हणजे नेहा शेवाळे. नेहा पहिल्यांदाच साहसी दृश्ये करताना तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. याबाबत ती म्हणाली की, “या शोमध्ये आधीपासून असलेले स्पर्धक आम्हाला कसा प्रतिसाद देतील आणि मी मधूनच प्रवेश करत आहे त्यामुळे ते मला स्वीकारतील की नाही? याची मला थोडीशी भीती वाटत आहे.” तसेच या दोघांनीही विक्रम गायकवाड हा आपल्यासाठी तगडा प्रतिस्पर्धी असल्याचे म्हटले.
पुष्कर आणि नेहा इतर स्पर्धकांशी झुंज देण्यात यशस्वी ठरतात का? ते आता सोमवारीच कळू शकेल. झुंजमध्ये सुरुवातीला १५ सेलेब्रिटी स्पर्धकांचा समावेश होता. त्यातील सहाजण बाद झाले असून आता नऊ स्पर्धकांना पुष्कर आणि नेहाला लढा द्यावा लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा