बॉलिवूड अभिनेत्री अमिताभ बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल झाली असून अमिताभ आणि शाहरुख डॉन ३ मध्ये एकत्र दिसणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
आणखी वाचा : अग्निपथ योजनेचा विरोध करणाऱ्यांवर भडकली कंगना, पोस्ट शेअर करत म्हणाली…
अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत अमिताभ आणि शाहरुख दिसत आहेत. फोटोमध्ये अमिताभ डॉनचा पोस्टर साइन करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शाहरुख त्यांच्याशी काही बोलताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत डॉन असे कॅप्शन केले दिले आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर डॉन ३ ट्रेन्ड होऊ लागला आहे.
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
आणखी वाचा : ‘हम पांच’मधील ही अभिनेत्री साकारणार “तारक मेहता…”मधील दयाबेनची भूमिका?
चाहत्यांना असं वाटत की बिग बींनी शुक्रवारी डॉनच्या एडव्हान्स बूकिंगचा जुना फोटो शेअर केला होता. त्यानंतर शाहरुखसोबतचा हा फोटो म्हणजे लवकरच डॉन ३ येणार असं म्हटलं जातं आहे.
आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम
दरम्यान, अमिताभ लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानंतर बिग बी दीपिका आणि प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहेत.