२०१३ मध्ये ‘मॅन ऑफ स्टिल’ (Man of steel) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून डीसी कॉमिक्सच्या इक्सटेन्डेड यूनिव्हर्सची (DC Extended Universe) सुरुवात झाली. झॅक स्नायडर (Zack Snyder) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट सुपरमॅन या डीसी कॉमिक्सच्या सुपरहिरोवर आधारलेला आहे. हेन्री कॅव्हिल (Henry Cavill) या ब्रिटीश अभिनेत्याने या चित्रपटामध्ये सुपरमॅनचे पात्र साकारले होते. तो या चित्रपटाव्यतिरिक्त डीसीईयूच्या ‘बॅटमॅन व्हर्सस सुपरमॅन’ (Batman vs superman), ‘जस्टिस लीग’ (Justice league) आणि ‘जस्टिस लीग स्नायडर कट’ (Justice league snyder cut) या चित्रपटांमध्ये झळकला आहे.

दिग्दर्शक झॅक स्नायडर २०१६ मध्ये ‘जस्टिस लीग’ तयार करत होते. काही कारणांमुळे त्यांना हा चित्रपट सोडावा लागला. त्यांच्या जाण्याने मॅन ऑफ स्टिलचा सिक्केल येणार नसल्याची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या घटनेमुळे हेन्री कॅव्हिलनेही यापुढे सुपरमॅन साकारणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान या चित्रपटासंबंधित नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – “तुम्ही मोठ्या आहात म्हणून…” जया बच्चन यांचं ‘ते’ कृत्य पाहून उर्फी जावेद भडकली

या आठवड्यामध्ये डीसीईयूचा ब्लॅक अ‍ॅडम (Black adam) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये हेन्री पुन्हा एकदा सुपरमॅनच्या अवतारामध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर या संदर्भामध्ये चर्चा रंगल्या आहेत. द हॉलिवूड रिपोर्टरने दिलेल्या वृत्तानुसार, वॉर्नर ब्रदर्सच्या व्यवस्थापनातील सदस्य हेन्रीला राजी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावरुन ‘मॅन ऑफ स्टिल २’ येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा – “तर मी स्वतः माफी…” स्टँड अप कॉमेडीयन झाकीर खानने केला त्याच्या नव्या वेबशोबद्दल खुलासा

‘मॅन ऑफ स्टिल २’ (Man of steel 2) च्या कथानकावर काम सुरु झाले असून काही महिन्यामध्ये त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट २०२४ किंवा २०२५ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. हेन्री कॅव्हिल व्यतिरिक्त चित्रपटातील स्टारकास्टबाबतची माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. असे द हॉलिवूड रिपोर्टरने दिलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. सुपरमॅनच्या पुनरागमनाच्या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Story img Loader