दाक्षिणात्य सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभास देशातल्या असंख्य तरुणींचा क्रश आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या चाहत्यांमध्ये तरूणींचा संख्याच जास्त असल्याचं दिसून येतं. पण कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा हा अभिनेता ‘राधे श्याम’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लग्नाच्या बेडीत अडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. ४२ वर्षीय प्रभासच्या लग्नाबाबत एस्ट्रोलॉजर आचार्य विनोद कुमार यांनी भविष्यवाणी केली आहे. दरम्यान या आधी प्रभासनंही एका मुलाखतीत, ‘बाहुबली’ प्रदर्शित झाल्यानंतर मी लग्न करेल असं कुटुंबीयांना सांगितलं आहे असं म्हटलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता प्रभासच्या लव्ह लाइफबाबत याआधीही भविष्यवाणी झाली होती. मात्र ती चुकीची ठरली होती. त्यानंतर आता प्रभासच्या लग्नाविषयी भविष्यवाणी करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये बोलताना विनोद कुमार म्हणाले, ‘२०२२ हे वर्ष प्रभाससाठी खूप खास आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याच्या लग्नाचा योग आहे. ऑक्टोबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात प्रभास लग्नबंधनात अडकू शकतो.’

आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड

व्हिडीओ शेअर करताना विनोद कुमार म्हणाले, ‘प्रभास लवकरच लग्न करू शकतो. माझी भविष्यवाणी भारतातील सर्वात हॅन्डसम अभिनेत्याबाबत आहे. जो लवकरच ‘राधे श्याम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जय माता दी.’

आणखी वाचा- ‘भारताचे राष्ट्रपती कोण?’ असा प्रश्न विचारताच प्रसिद्ध अभिनेत्रीची बत्ती गुल; वाचा नेमकं काय घडलं

दरम्यान आगामी काळात प्रभास ‘राधे श्याम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर तो अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम करताना दिसणार आहे. सध्या तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘के’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभासनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला भाग्यवान मानत असल्याचं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will prabhas getting married after release of radhe shyam prediction by acharya vinod kumar mrj