सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वतःच्या कामातून संपूर्ण जगभर त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूडमध्येही त्यांनी यश मिळवले. रजनीकांत यांच्या अभिनयात अशी जादू आहे की, चाहत्यांनी त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत नव्या कलाकारांना टक्कर देताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवकरच रजनीकांत दिग्दर्शक लोकेश कनगराजबरोबर ‘Thalaivar 171’ या चित्रपटात काम करणार आहेत. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा १६९ वा चित्रपट आहे. त्यानंतर रजनीकांत हे आपल्या मुलीच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत, हा चित्रपट त्यांचा १७० वा चित्रपट ठरणार आहे.

आणखी वाचा : ‘पुष्पा २’मधील भंवर सिंह आलाय बदला घ्यायला; सेटवरील अभिनेता फहाद फाजीलचा फोटो व्हायरल

यानंतरच रजनीकांत लोकेश कनगराजच्या आगामी ‘Thalaivar 171’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. याआधीसुद्धा रजनीकांत आणि लोकेश यांनी एकत्र चित्रपट करायचा प्रयत्न केला होता, पण तो योग काही जुळून येत नव्हता. सध्या लोकेश हे त्यांच्या थलपती विजयसह ‘लिओ’ या चित्रपटावर काम करत आहेत. याचे काम पूर्ण झाल्यावर लोकेश रजनीकांत यांच्याबरोबर आगामी चित्रपटावर काम करणार आहेत.

लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील होऊ शकते. याबरोबरच आणखी एका बातमीमुळे रजनीकांत यांचे चाहते नाराज आहेत. असे म्हटले जात आहे की, ‘Thalaivar 171’ हा चित्रपट रजनीकांत यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. रजनीकांत यानंतर चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. लोकेश कनगराजबरोबर काम केलेला अभिनेता आणि तमीळ दिग्दर्शक मिस्किन यांच्या एका वक्तव्यामुळे ही चर्चा होत आहे.

एका मुलाखतीमध्ये लोकेशविषयी बोलताना मिस्किन म्हणाले, “लोकेश एक जबरदस्त फिल्ममेकर आहे. देशभरात त्याची चर्चा आहे. तो त्याचा आगामी चित्रपट रंजीनकांतबरोबर करत आहे. अशी चर्चा आहे की, हा चित्रपट रजनीकांत यांचा शेवटचा असेल, यात किती तथ्य आहे ते मला माहीत नाही. पण आज ५० वर्षे या क्षेत्रात काम केलेला एक सुपरस्टार लोकेशसह चित्रपट करायची इच्छा व्यक्त करतो ही लोकेशसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे.”

आणखी वाचा : तब्बल वर्षभरानंतर ‘मी वसंतराव’ हा चित्रपट येणार ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

यामुळे रजनीकांत यांच्या निवृत्तीबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अद्याप रजनीकांत यांनी स्वतः किंवा त्यांच्या जवळच्या लोकांपैकी कुणीच या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. रजनीकांत यांना लोकेश कनगराजच्या चित्रपटात पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.