सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ऑस्करच्या मंचावर जे काही झाले ते कोणालाही अपेक्षित नव्हते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुत्रसंचालकाने विनोद करताना विचार केला पाहिजे का असा प्रश्न विचारला. यावर सलमान म्हणाला, सुत्रसंचालकाने विनोद करताना विचार केला पाहिजे. विनोद हा मर्यादेत राहून केला पाहिजे. या कार्यक्रमात मनीष पॉल आणि वरूण धवन देखील उपस्थित होते. यावेळी वरुण म्हणाला, समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो.
अनेक रिअॅलिटी शोचे सुत्रसंचालन करणारा मनीष पॉल म्हणाला, “पूर्वी विनोद हे मोकळेपणाने केला जात होता आणि आता अधिक गोष्टी संवेदनशील झाल्या आहेत. मी जेव्हा कधी स्टेजवर आलो आहे, तेव्हा मी कोणालाही नाराज केले नाही. हे सर्व तुमच्या विनोदबुद्धीवर अवलंबून आहे.”
आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या स्त्रिया पतीला बनवतात श्रीमंत, जाणून घ्या त्यांच्याविषयी
दरम्यान, विल स्मिथच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत क्रिस रॉक हा विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवत असल्याचे दिसते. दरम्यान, विल स्मिथ स्टेवर गेला आणि त्याने क्रिसला कानशिलात लगावली. त्यानंतर तो त्याच्या जागेवर येऊन म्हणाला, “माझ्या पत्नीचे नाव पुन्हा तुझ्या तोंडातून घेऊ नकोस.” यावर उत्तर देत क्रिस म्हणाला, “तो अस करणार नाही.”