Will smith Duane Martin Controversy: २०२२ च्या ऑस्कर सोहळ्यात हॉलिवूड स्टार विल स्मिथ व कॉमेडीयन क्रिस रॉक यांच्यातील वाद आजही लोकांच्या लक्षात आहे. विल स्मिथने क्रिसला थोबडावल्याने तो त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा विल स्मिथ अशाच एका विचित्र गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. विल स्मिथने आपला खास मित्र व सहकलाकाराबरोबर यौन संबंध ठेवल्याचा खुलासा त्याच्याच एका सहकलाकाराने केल्याने मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे.

विल स्मिथचा एक्स असिस्टंट ब्रदर बिलाल याने नुकतीच ‘अनवाइन विथ ताशा के’ या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. याच मुलाखतीदरम्यान त्याने विल स्मिथ व त्याचा मित्र आणि सहकलाकार दुआने मार्टिन यांच्यातील शारीरिक संबंधाबद्दल खुलासा केला आहे. बिलालने स्वतः त्या दोघांना शारीरिक संबंध प्रस्थापित करताना (Anal sex) करताना पाहिल्याचाही खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘लोकी’ म्हणून शाहरुख खान अगदी योग्य; किंग खानच्या ‘देवदास’चा संदर्भ देत टॉम हिडलस्टनने केलं वक्तव्य

बिलाल या मुलाखतीमध्ये म्हणाला, “मी एकदा दुआनेच्या ड्रेसिंग रूममध्ये शिरत होतो तेव्हा मी दुआनेला विल स्मिथबरोबर सेक्स करताना पाहिलं. तिथे एक सोफा होता आणि विल त्या सोफ्यावर होता आणि दुआने तिथे उभा होता, मी त्यांना त्या संदिग्ध अवस्थेत पाहिलं आहे.” बिलालचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

नुकतंच हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने यावर मौन सोडलं आहे. या सगळ्या गोष्टी खोट्या ठरवत त्याने या आरोपांचं खंडन केलं आहे. ‘यूएस वीकली’शी संवाद साधताना विल याबद्दल म्हणाला, “ही गोष्ट पूर्णपणे खोटी आणि रचलेली आहे आणि माझ्या सेक्स लाईफबद्दल करण्यात आलेले दावे धादांत खोटे आहेत.” परंतु विलचा मित्र व सहकलाकार दुआने याने अद्याप यावर भाष्य केलेलं नाही.

इतकंच नव्हे तर विल स्मिथची पूर्व पत्नी जॅडा स्मिथ हीनेसुद्धा यावर भाष्य केलं आहे. मिडीयाशी संवाद साधतांना जॅडा म्हणाली, “आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. एखाद्याबद्दल तुमचं मत मांडणं वेगळं आणि खोट्या, मनाला वाटेल तशा गोष्टी रंगवून सांगणं वेगळं आहे, हे फारच हास्यास्पद आहे.” अद्याप या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नसली तरी विल स्मिथने सांगितल्याप्रमाणे त्याच्या चाहत्यांनी त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवत त्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं आहे.

Story img Loader