दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. गोलमालच्या सिरीजमधील चौथ्या चित्रपटाच्या चित्रीकरणास यावर्षी सुरुवात करणार असल्याचे रोहितने सांगितलेय.
दिलवालेच्या प्रदर्शनानंतर रोहितने ‘गोलमाल ४’ची कथा लिहण्यास सुरुवात केल्याचे तो म्हणाला. रोहित म्हणाला की, सध्या मी दोन चित्रपटांवर काम करत आहे. त्यातील ‘गोलमाल ४’ चे काम लवकरच सुरु होईल. तसेच मी करण जोहरसोबत ‘राम लखन’च्या रिमेकवरही काम करतोय. दोन्ही चित्रपटांच्या कथांवर सध्या काम चालू असून पुढील सहा महिन्यात त्यांच्या चित्रीकरणासही सुरुवात होईल. ‘गोलमाल ४’मध्येही अजय देवगण दिसण्याची शक्यता आहे. मात्र, ‘राम लखन’च्या रिमेकमध्ये कोणते चेहरे दिसणार याबाबत रोहितने मौन बाळगणे पसंत केले.
‘गोलमाल ४’ च्या चित्रीकरणाचा यावर्षी होणार श्रीगणेशा
करण जोहरसोबत 'राम लखन'च्या रिमेकवरही काम करतोय.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 22-02-2016 at 12:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will start shooting golmaal 4 this year rohit shetty