प्रसिद्ध महिला बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर ‘मेरी कोम’ नावाचाच चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. मेरी कोम ही मुळची मणिपूरची. ऑलिंम्पिकमध्ये मुष्टियुद्ध प्रकारात तिने कांस्य पदक मिळवले. तर, अशा या मेरी कोमच्या जीवनावर निर्माण करण्यात आलेला चित्रपट तिच्या मूळ गावी मणिपूरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटकर्ते प्रयत्नशील आहेत. गेल्या काही वर्षापासून मणिपूरमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित करणे बंद झाले आहे. काही अतिरेकी संघटनांच्या भितीमुळे येथे हिंदी चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत. याविषयी बोलताना ‘वायकॉम १८ मोशन पिक्चर्स’चे सीओओ अजित अंधारे म्हणाले, मणिपूरच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मणिपूर हे मेरी कोमचे जन्मगाव असून, मेरी कोम ज्या गावातून आली ते गाव आणि तेथील संसकृती चित्रपटाचा महत्वाचा भाग आहे. या भागात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेदेखील ते म्हणाले. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘मेरी कोम’ चित्रपटात काम करत आहे. चित्रपटात मेरी कोमची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रियांकाला पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेल्या मेरी कोमने स्वत: सहाय्य केले. मुष्टियुद्धातील बारकावे शिकण्यासाठी प्रियांकाने मेरी कोमबरोबर खूप वेळ व्यतित केला. दोन पोस्टर्सद्वारे चित्रपटाचे फर्स्टलूक प्रदर्शित करण्यात आले असून, सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या पोस्टर्सप्रमाणेच चित्रपटदेखील उत्कृष्ट असण्याची आशा चाहते बाळगून आहेत. दिग्दर्शक ओमंग कुमारचा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा