भाग मिल्खा भाग’ चित्रपटामुळे आजच्या पिढीला माझे खेळातील योगदान आणि सहभाग याबाबत कळणार असल्याचे, प्रख्यात क्रीडापटू मिल्खा सिंग यांनी सदर चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळी सांगितले. ‘ भाग मिल्खा भाग’ चित्रपटाची झलक आणि संगीताचे उपनगरातील मल्टिप्लेक्समध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळेस चित्रपटातील कलाकार फरहान अख्तर, सोनम कपूर, दिग्दर्शक ओमप्रकाश झा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिल्खा सिंग स्वतः उपस्थित होते.
मिल्खा सिंग म्हणाले की, माझ्या वयाच्या व्यक्तींना माझ्याबाबत नक्कीच माहिती असेल, पण आताच्या पिढीला माझी माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे. मला फार आनंद होत आहे की, निदान या चित्रपटाच्या माध्यातून आजच्या आणि पुढे येणा-या पिढीला माझ्याबद्दल कळेल. मिल्खा सिंग यांना चित्रपट पाहण्याची फारशी आवड नसल्यामुळे चित्रपट दिग्दर्शक व कलाकारांची फारशी माहिती नाही. त्यांनी शेवटचा चित्रपट १९६० साली पाहिला होता. त्यांचा मुलगा जीव याने ओमप्रकाश मेहरा यांना मिल्खा सिंग यांच्यावर चित्रपट बनवण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. सदर चित्रटात फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका केली आहे.

Story img Loader