करण जोहरचा ‘कलंक’ चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण करत आहे. १९४० च्या दशकात घडणाऱ्या कथेची किनार या चित्रपटाला लाभली आहे. या चित्रपटाचं कथानक काय असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात अजूनही कुतूहल आहे मात्र चित्रपटाची कथा गुलदस्त्यात ठेवणंच दिग्दर्शकांनी पसंत केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटात आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहे. ‘कलंक’मधल्या एक एक कलाकारांच्या भूमिकेवरून पडदा उठत आहे. आता #WomenOfKalank हा हॅशटॅग वापरून ‘कलंक’मधल्या पहिल्या अभिनेत्री ओळख करून देण्यात आली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच आलिया भट्ट होय. ती राजकुमारी रूपच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिषेक वर्मन या चित्रपटाचे दिग्दर्शक असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मीती होणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी करण जोहरच्या वडिलांना या चित्रपटाची कल्पना सुचली होती. मात्र या चित्रपटाला सुरूवात होण्याआधीच त्यांचं निधन झालं. १५ वर्षांनंतर करणनं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं आहे.