Cycling and Bollywood Connection : चित्रकार एम. एफ. हुसैन व माधुरी दीक्षित दिल्लीतील रस्त्यावरून सायकलवर फिरतायत… असे फोटो सेशन तुम्ही पाहिले आहे का? हुसैन सायकल चालवताहेत व माधुरी मागच्या सीटवर बसलीय असे साधारण २४ वर्षांपूर्वी एका मॅगझिनने त्यांचे खास फोटो सेशन करुन वेगळेपण दाखवले.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण मेहबूब स्टुडिओत संगीता बिजलानी शूटिंग करीत असताना सलमान खान चक्क सायकलवरून तिला भेटायला येई हा त्या काळात गॉसिप्स मॅगझिनमधून हमखास चघळला जाणारा विषय होता. ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित होण्यापूर्वीच संगीता बिजलानी नामांकित मॉडेल होती व सलमानशी असणारी तिची दोस्ती खास चर्चेत होती आणि मेहबूब स्टुडिओपासून सलमानचे घर अगदीच पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. मग सायकलने आलेले अगदीच उत्तम.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

आपल्या दोन्ही सोनाली कुलकर्णी सायकल प्रेमी आहेत. मोठी सोनाली सोशल मिडियात आपले तसे सायकल सफारीचे फोटो पोस्ट करुन सायकल व्यायाम आणि फिटनेस यासाठी कशी उपयुक्त हेही सांगते. मूळची पुण्यातील असल्याने तेथील लहान-मोठ्या गल्लीतील सायकल चालवायचा तिला बराच अनुभव असावा आणि फिटनेससाठी सायकल अतिशय उत्तम हे तिचे म्हणणेही बरोबरच आहे. ज्युनियर सोनाली कुलकर्णी ओशिवरा परिसरात अधूनमधून सायकल चालवताना दिसते असे पटकन म्हटले तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नका. त्यात तत्थ आहे. ती देखील सायकल प्रेमी आहे. पुणे, नाशिक, अलिबाग वगैरे ठिकाणाहून मनोरंजन क्षेत्रात आलेले अनेक कलाकारांच्या घरी वडिलोपार्जित सायकल असल्याचे व त्यानी शाळा कॉलेजमध्ये जा-ये करण्यास सायकलचा मनसोक्त वापर केल्याचे लक्षात येईल. आदिती गोवित्रीकर नवीन पनवेलमधील आपल्या काळे वाड्यातून सायकलनेच शाळेत जाई याची आठवण ती पूर्वी आवर्जून सांगे. छोट्या शहरातून आलेले कलाकार आपले आवडते वाहन म्हणून सायकलच सांगत.

आणखी वाचा : सोनाक्षी सिन्हाला रामायणावरील या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आले नाही, बिग बी म्हणाले…

आपल्या चित्रपटातील वाहन संस्कृती या वाटचालीतील सायकलला अगदी चित्रपटाचे नाव, पटकथा, गीत-संगीत तर झालेच पण अगदी फोटो सेशनमध्येही स्थान आहे. ‘सायकल’ नावाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटेचा चित्रपट येतो आहेच. कोकणातील एका सायकल प्रेमीची सायकल दोन चोर पळवतात याभोवती त्याची गोष्ट आहे. गावागावात घरोघरी सायकल ही संस्कृतीच आहे म्हणा. मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जिता वोही सिकंदर’ची पटकथाच सायकल स्पर्धेभोवती होती. आमिर खान, आयेशा झुल्का, पूजा बेदी, मामिक असे अनेक कलाकार त्यात होते. सुभाष घईच्या ‘यादे’मध्ये ह्रतिक रोशन व करिना कपूर यांच्यावर सायकलची बरीच दृश्ये होती. पण ती दाखवताना एका विशिष्ट कंपनीच्या सायकलचा ब्रॅण्डच जणू दाखवला जातोय असेच प्रकर्षाने लक्षात आले आणि जणू सायकल घसरली. पूर्वीच्या सामाजिक कौटुंबिक चित्रपटात सायकल दृश्य दिसे. सायकलवरची गाणी हा आणखीन एक भन्नाट प्रकार. त्यात अतिशय श्रवणीय व देखणे म्हणजे विजय आनंद दिग्दर्शित ‘तेरे मेरे सपने’मधील ‘एक मैने कसम ली…’ सायकलस्वार देव आनंदला मुमताजच्या ‘डबल सीट’चा छान सहवास. कधी ती मागे बसलीय. तर कधी पुढे. देव आनंद म्हणजे जबरा रोमान्स हे समीकरण येथेही दिसते. ‘पडोसन’मध्ये सायरा बानू व तिच्या मैत्रिणी सायकलवरच ‘मै चली मै चली…’ गातात. ग्रामीण भागात पोस्टमन सायकलवरून पत्रांचे वाटप करी. ‘पलको की छाँव मे’ मधील राजेश खन्ना ‘डाकियाँ डाक लाया…’ हे सायकलवरुनच गातो. पूर्वीच्या अनेक चित्रपटातून सायकल दिसे. कधी गाण्यात तर कधी विनोदात. विशेषतः पोपटलाल उर्फ राजेंद्रनाथने सायकल सवारीत बरेच घाईघाईत विनोद केलेत.

आणखी वाचा : “तुझं सर्वात Best Reel…”, जिनिलियाचा शक्ती कपूर यांच्यासोबत धमाल डान्स व्हिडीओवर रितेशची कमेंट चर्चेत

या सगळ्यात मेहमूदच्या ‘कुंवारा बाप’ची सायकल रिक्षा अगदी वेगळीच. त्याच्याच रिक्षात एक दाम्पत्य (विनोद मेहरा व भारती) तान्हुल्याला सोडून जाते म्हणून त्याचे पालकत्व मेहमूद स्वीकारतो. पण ते मुल मोठे होतानाच लक्षात येते, त्याला पोलियो आहे.

(मूळ लेख ‘गडय़ा, आपली सायकल बरी..!’ या मथळ्याखाली काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. आज जागतिक सायकल दिनानिमित्त तो पुनः प्रकाशित करण्यात आलाय)

Story img Loader