गेल्या शुक्रवारी रणबीर कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल यांचा ‘रॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिलेला हा चित्रपट तिकीट बारीवर चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला.
काही दिवसांपूर्वी जॅकलीन या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी एका कार्यक्रमात गेली होती. तेव्हा तिला एखादा आत्मचरित्रपट करावयास आवडेल का असे विचारले असता ती म्हणाली, जर मला आत्मचरित्रपट करावसा वाटला, तर मला मदर तेरेसा यांची भूमिका साकारायला आवडेल. मला असं वाटतं की त्या भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत आणि मला त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल. जॅकलीनची ही इच्छा भविष्यात पूर्ण होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.

Story img Loader