बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान याने जवळपास ४ वर्षांनी लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून सोशल मीडियावर कमबॅक केले. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल असे म्हटले जात होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास तीन ते चार आठवडे उलटले आहेत. पण आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. नुकतंच या चित्रपटाचे लेखक अतुल कुलकर्णी यांनी हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
‘फॉरेस्ट गंप’ या इंग्रजी क्लासिक चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजेच ‘लाल सिंग चड्ढा’ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आमिर खानने मुख्य भूमिका साकारली आहे. मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. आमिर खानबरोबर करीना कपूरही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. मात्र आतापर्यंत या चित्रपटाने फक्त १२७ कोटींची कमाई केली आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. एवढंच नाही तर आमिरचा हा चित्रपट परदेशातही कमाल दाखवू शकला नाही. यावर आता अतुल कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : …अन् आमिर खानने दिलं नागराज मंजुळेंना स्क्रिनिंगला येण्याचे आमंत्रण, वाचा नेमकं काय घडलं?
अतुल कुलकर्णी यांनी नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अतुल कुलकर्णी म्हणाले, “जेव्हा विनाश मोठ्या कामगिरीप्रमाणे साजरे केले जातात, तेव्हा सत्याची किंमत मातीमोल होते.” अतुल कुलकर्णी यांच्या या ट्वीटवर अनेक जण प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काहींनी तर हे ट्वीट त्यांनी लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाला म्हणून केल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा : “आम्ही कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी पण तुम्ही…” नागराज मंजुळेंबाबत आमिर खानने केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत
बॉक्स ऑफिसवर नुकसान झाल्यानंतर ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांना ओटीटी डीलमध्येही नुकसान झालं. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससोबत सुमारे १५० कोटींचा करार केला आहे. पण हा चित्रपट फ्लॉप ठरताच हा करारही तुटला. नवीन माहितीनुसार, लाल सिंह चड्ढा यांचे डिजिटल अधिकार आता ५० कोटींना विकले गेले आहेत.