मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ९ जानेवारी रोजी जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेल्या ‘जादूनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक मूळ हिंदी भाषेत आहे आणि याचा इंग्रजी अनुवादही करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन लोकप्रिय लेखक, चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान जावेद अख्तर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी त्यांची मतं परखडपणे मांडली. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, “अनेकजणांना हा प्रश्न पडला आहे तो आज मी तुम्हाला विचारात आहे की तुमचं देवाशी नेमकं भांडण का आहे? यामागे नेमकं कारण काय?” जावेद अख्तरांनी मजेशीर उत्तर दिल की, “स्वर्गात माझी आवडती फळं उपलब्ध नाहीत. जसं की केळ, तिथे मिळत नाही ते माझं आवडत फळ आहे. म्हणून मला नरकात जायचं आहे. मला बरेच जण हा प्रश्न विचारात की तुम्ही नास्तिक का आहात? मी त्यांना एकच उत्तर देतो की मी विचार करतो.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शाहरुख खानच्या ‘पठाण’मधील गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. सेन्सॉर बोर्डच्या निर्णयावर आणि प्रमाणपत्रावर आपण विश्वास ठेवायला हवं असं जावेद अख्तर म्हणाले. याबरोबरच प्रत्येक धर्माच्या वेगळ्या आणि स्वतंत्र सेन्सॉर बोर्डावरही जावेद अख्तर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. जगतगुरु शंकराचार्य यांनी वेगळ्या धर्म सेन्सॉर बोर्डवर केलेल्या वक्तव्यावर जावेद अख्तर म्हणाले, “मी त्यांच्या वक्तव्याचा विरोध करणार नाही. असं सेन्सॉर बोर्ड जरूर बनायला हवं, जर मध्यप्रदेशात सेन्सॉर बोर्ड होऊ शकतं तर मग ही गोष्टही व्हायलाच हवी. यात काय चुकीचं आहे?”
आई-वडिलांचं उदारण देत फरहान अख्तरनं सांगितलं नास्तिक असण्याचं कारण
जावेद अख्तर बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार, पटकथाकार आणि संवाद लेखक आहेत. त्यांनी सत्तर ऐंशीच्या दशकात सलीम खान यांच्याबरोबरीने अनेक चित्रपटांचे संवाद लिहले आहेत. जावेद अख्तर सामाजिक घटनांवरदेखील भाष्य करत असतात.