सुनिल सिंग आणि समीर सिंग हे रेसलिंग क्षेत्रताली नामांकित फायटर आहेत. त्यांच्या भारतीय टीमला WWE मध्ये ‘द बॉलिवूड’ बॉईज या नावानं ओळखलं जातं. ही मंडळी बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकत WWE रिंगमध्ये एण्ट्री करतात. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचं बॉलिवूड कनेक्शन केवळ एण्ट्री घेण्यापुरतं मर्यादित नाही. तर इतर भारतीय चाहत्यांप्रमाणे ते देखील बॉलिवूडपटांचे खुप मोठे चाहते आहेत. नुकतंच लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं बॉलिवूड प्रेम व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही आपल्या टीमचं नाव बॉलिवूड बॉईज असं का ठेवलं?

आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. असं काही तरी जे प्रेक्षकांना पाहायला आवडेल. जगभरातील लोक बॉलिवूड चित्रपट मोठ्या आवडीनं पाहतात. शिवाय आम्ही देखील बॉलिवूडपटांचे खुप मोठे फॅन आहोत त्यामुळे आम्ही आमच्या टीमचं नाव ‘बॉलिवूड बॉईज’ असं ठेवलं.

बॉलिवूडमधील कोणते चित्रपट तुम्हाला सर्वाधिक आवडतात?

आम्हाला गोविंदा, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार हे कलाकार खुप आवडतात. त्यांचे चित्रपट आम्ही आवडीने पाहातो. विशेषत: अक्षय कुमार मला खुप आवडतो. सुदैवानं त्याच्या ‘ब्रदर’ या चित्रपटात मला काम करण्याची संधी देखील मिळाली होती.

मला शाहरुख खान खुप आवडतो. त्याचा अभिनय, व्यक्तीमत्व, त्याची वागणूक अत्यंत आकर्षक आहे. त्याला पाहून मी मोटिव्हेट होतो. मीच काय संपूर्ण जगातील लोक त्याचे फॅन आहेत.

(येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं WWE एका खास कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. सोनी टेन १ आणि सोनी टेन ३ (हिंदी) या वाहिन्यांवर तुम्ही WWE सुपरस्टार्सला जबरदस्त अॅक्शन करताना पाहू शकता.)