ऑस्कर विजेती प्रसिद्ध अभिनेत्री हॅले बेरीला कोणी ओळखत नाही असे तर होऊच शकत नाही. पण बेरी मुंबईच्या रस्त्यांवर एकटी फिरत होती आणि तिला कोणी ओळखलेही नाही. बेरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुंबईतील काही फोटो शेअर केले आहेत. ती सध्या मुंबईत फिरायला आली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने म्हटले की, ‘आज स्वतःला हरवण्याचा दिवस आहे.’ तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने मुंबईच्या सुर्योदयाचा फोटो शेअर केला. मुंबईच्या या ट्रिपमध्ये ती बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि अनन्या बिड यांनाही भेटली. दियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हॅलेसोबतचे फोटो शेअर केले.

दियाने बेरीसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती भारतीयांना नमस्ते बोलताना दिसते. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी लाइक आणि शेअर केले आहे. हॅले बेरीने आतापर्यंत ‘एक्स मॅन’, ‘मॉन्स्टर बॉल’, ‘डाय अनदर डे’ अशा हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘क्लाऊड अॅटलास’ सिनेमात ती भारतीय लूकमध्ये दिसली होती. या सिनेमात तिने साडी आणि बांगघ्या घातल्या होत्या.

Story img Loader