बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभियनासोबतच यामीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. यामी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत यामी चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा सोशल मीडियावर यामी चाहत्यांशी संपर्क साधते. अनेक वेळा यामीला तिच्या सौंदर्याविषयी विचारण्यात येते. यामीची त्वचा ही अप्रतिम आहे आणि तिच्या सौंदर्यात कोणती कमी नाही असे तिच्या चाहत्यांना वाटते. मात्र, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला त्वचेचा आजार आहे आणि त्यावर कोणताही इलाज नाही असे यामीने सांगितले आहे.

यामीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये यामीने काही फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत यामीने तिच्या त्वचेच्या आजाराविषयी सांगितले आहे. “माझ्या इन्स्टाग्राम कुटुंबाला नमस्कार, मी नुकतेच फोटोशूट केले आणि जेव्हा ते त्या फोटोचे पोस्ट प्रोडक्शन म्हणजे फोटो ए़डिट करत माझ्या त्वचेवर असलेल्या केराटोसिस-पिलारिस नावाच्या त्वचेच्या कंडिशनला लपवणार होते, तेव्हा मला वाटले अरे यामी, तू हे सत्य का स्वीकारत नाहीस?,” असे यामी म्हणाली.

पुढे यामी म्हणाली, “ज्या लोकांनी याबद्दल ऐकले नाही त्यांच्यासाठी, ही एक त्वचेची कंडिशन आहे ज्यात आपल्याला त्वचेवर लहान पुळ्या येतात. या पुळ्या तुमच्या शेजारच्या काकू सांगतात तेवढ्या वाईट नाही आणि तुमच्या मनाइतक्या वाईट नाहीत. मी तरुण असतानाच मला या त्वचेच्या कंडिशनबद्दल सजमले आणि अजुनही यावर कोणताही इलाज नाही.”

आणखी वाचा : KBC 13 : १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

या विषयी सांगताना यामी म्हणाली, “अनेक वर्षांपासून मी हा त्रास सहन करत आहे आणि आज शेवटी, मी माझी भीती आणि असुरक्षितता सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यात असलेला ‘दोष’ मनापासून स्वीकारण्याचे धैर्य मिळवले आहे. यातून मला माझ्याविषयी असलेले हे सत्य तुमच्यासोबत शेअर करण्याचे धाडसही मिळाले. मला माझे फॉलिक्युलायटीस एअरब्रश करणे किंवा डोळ्यांच्या खाली किंवा मग कंबरेला ‘आकार देण्याची’ इच्छा होत नव्हती आणि तरीही, मला सुंदर असल्याचे वाटत होते.”

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

दरम्यान, यामी गौतमचा ‘भूत पोलिस’ या चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात यामीसोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस आहे. यामी लवकरच ‘लॉस्ट’, ‘अ थर्सडे’ आणि ‘दसवी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Story img Loader