निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले. प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत असत. चित्रपट तयार करताना ते पूर्ण आत्मविश्वासाने त्या चित्रपटावर काम करायचे. मात्र ‘सिलसिला’ हा चित्रपट बनवताना त्यांना भीती वाटली. ‘सिलसिला’मध्ये अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील लव्ह ट्रँगल आणि अमिताभ बच्चन आणि रेखा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. पण या चित्रपटाची सुरुवातीची स्टारकास्ट वेगळीच होती.
आणखी वाचा : “‘चुप: द रिव्हेंज ऑफ अॅन आर्टिस्ट’ चित्रपटातील सगळी वाद्ये मी…”, अमिताभ बच्चन यांनी केला मोठा खुलासा
या चित्रपटासाठी यश चोप्रा यांनी आधी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता पाटील आणि परवीन बाबीला कास्ट केले होते. परंतु ही यश चोप्रा यांची ड्रीम कास्ट नव्हती. त्यांना रेखा आणि जया यांना या चित्रपटात कास्ट करण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यावेळीची परिस्थिती बघता यश चोप्रा या दोघींनाही अमिताभ बच्चनबरोबर एकाच चित्रपटात घेण्याचे धाडस दाखवू शकत नव्हते.
अमिताभ बच्चन आणि जया यांचे त्यावेळी लग्न झाले होते. पण लग्नाआधी अमिताभ आणि रेखाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र काही कारणास्तव रेखा आणि अमिताभ यांचे लग्न होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की लग्नानंतरही रेखा आणि अमिताभ यांचे सिक्रेट अफेअर सुरू होते, ज्याची बातमी जया बच्चन यांना मिळाल्यानंतर मिळाली त्या नाराज झाल्या होत्या. जया यांनी अमिताभ बच्चन यांना सक्त सूचना दिल्या होत्या की त्या रेखासोबत कधीही काम करणार नाहीत. यामुळे यश चोप्रा यांना हा चित्रपट तयार करताना भीती वाटत होती.
याविषयी यश चोप्रा यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “मला सिलसिलाबद्दल भीती वाटत होती कारण या चित्रपटाद्वारे एक वास्तविक जीवनावर आधारित चित्रपट पडद्यावर येणार होता. ‘मी या चित्रपटाच्या कास्टिंगवर खूश आहे का?’, असे मला एकदा अमितजींनी मला विचारले. मी अमिताभबरोबर स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांना साइन केले होते. तेव्हा मी अमितजींना सांगितले की त्यांना जया जी आणि रेखा जी यांना कास्ट करायचे आहे.”
हेही वाचा : बिग बी झाले आणखी एका आलिशान घराचे मालक, मुंबईत ‘या’ ठिकाणी खरेदी केली नवी मालमत्ता
यश चोप्रा पुढे म्हणाले, “माझे बोलणे ऐकल्यावर अमित जी थोडा वेळ गप्प बसले आणि नंतर म्हणाले की ते माझ्या निर्णयाशी सहमत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण रेखा जी आणि जया जी यांना चित्रपटासाठी तयार करण्याची जबाबदारी अमिताभ यांनी माझ्यावरच सोडली. तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो. खऱ्या आयुष्याची गोष्ट चित्रपटाच्या पडद्यावर येणार होती. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून या चित्रपटाबद्दल मी जया आणि रेखा या दोघींनाही पूर्ण माहिती दिली.” जया बच्चन यांनी जबरदस्तीने या चित्रपटाला होकार दिला. रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांना ‘सिलसिला’च्या संपूर्ण कथेत रस नव्हता. मात्र चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमुळे त्यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली.