२०२१ मध्ये समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. या घटनेमुळे समांथाच्या खासगी आयुष्याबद्दल खूप चर्चा झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘पुष्पा’ चित्रपटामध्ये तिने ‘ऊ अंतावा’ या गाण्यावर डान्स केला होता. या आयटम साँगमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. तिने बऱ्याच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. काही दिवसांपासून समांथा तिच्या ‘यशोदा’ या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून ती मायोसिटिस आजाराचा सामना करत आहे. तिने इन्स्टाग्रामवर रुग्णालयातला फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. या गंभीर आजारामुळे होणारा त्रास सहन करत ती ‘यशोदा’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तिच्या या आजाराबद्दल खूप अफवा पसरल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. माझा आजार गंभीर आणि जीवघेणा आहे असं काही लोक म्हणत आहेत. पण मी ज्या परिस्थितीत आहे, ती जीवघेणी नाही. या आजारामुळे सध्या तरी माझ्या जीवाला धोका नाही. मी मेले नाहीये, त्यामुळे अशा अफवा पसरवू नका.”

आणखी वाचा – बिग बॉसने अर्चना गौतमला घरातून बाहेर काढलं? शिव ठाकरेशी झालेलं भांडण पडलं महागात

‘यशोदा’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सुमा कनकला यांच्या कार्यक्रमामध्ये तिने हजेरी लावली होती. तिने सुमा यांच्याशी बोलताना “काही दिवस चांगले असतात, तर काही दिवस वाईट असतात. एखाद्या दिवशी मला काही करावसं वाटतं नाही. तर कधीकधी मला इथंवर येण्यासाठी घेतलेली मेहनत, कष्ट आठवतात. काहीही झालं तरी शेवटी आपण जिंकतो हे मला ठाऊक आहे. मी आता लढायला तयार आहे”, असे वक्तव्य केले. या कार्यक्रमात बोलताना तिला अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा – Video : “समीर चौगुले फक्त महाराष्ट्रात सुपाऱ्या घेतो पण मी…” लंडन रिटर्न गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाचही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर तिचे ‘शंकुतलम’ आणि ‘खुशी’ हे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.