महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेल कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबत सामाजिक आणि  राजकीय  जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वीपणे मात करणार्‍या यशवंतरावांचा जीवनपट अतिशय रंजक असा आहे. त्यांच्या याच जीवनप्रवासावर आधारित यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या १४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती एस्सेल व्हिजनची आहे


या चित्रपटात विविध बाजाची एकूण १६ गाणी नंदेश उमप, शंकर महादेवन, आरती अंकलीकर, रविंद्र साठे, विभावरी आपटे, आनंद शिंदे, उर्मिला धनगर अशा नामवंत गीतकारांनी त्यास गायले आहे. अशोक लोखंडे यांनी यशवंतराव चव्हाण यांची प्रमुख भूमिका चित्रपटात साकारली असून, लुब्ना सलिम, ओम भूतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहुल सोलापूरकर, बेंजामीन गिलानी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. येत्या १४ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader