टेलिव्हिजनच्या पडद्यावरील आमिर खानचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’ला स्टार परिवार सोहळ्यात नृत्याच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या आमिर खानचा स्टार परिवार सोहळ्यात गौरव करण्यात आला. मात्र, यावेळी स्टार परिवारातर्फे सामाजिक योगदानाबद्दल देण्यात आलेला पुरस्कार आमिरने नाकारला. त्याऐवजी कौतुकाची पोचपावती म्हणून आयोजकांकडून मिठाईचा पुडा स्विकारणेच त्याने पसंत केले. आमिरने यावेळी ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम आजच्या समाजासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात झालेले अनेक चांगले बदल अनुभवण्यास मिळाल्यामुळे आमिरने कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. यंदाच्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यावर ‘ये है मोहब्बते’ आणि ‘महाभारत’ या मालिकांचा प्रभाव असल्याचे पहायला मिळाले. या दोन्ही मालिकांना स्टार पुरस्कार सोहळ्यात अनुक्रमे सहा आणि चार पुरस्कार मिळाले.
…आणि आमिर खानने पुरस्कार नाकारला
टेलिव्हिजनच्या पडद्यावरील आमिर खानचा प्रसिद्ध कार्यक्रम 'सत्यमेव जयते'ला स्टार परिवार सोहळ्यात नृत्याच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या आमिर खानचा स्टार परिवार सोहळ्यात गौरव करण्यात आला.
First published on: 24-06-2014 at 05:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeh hai mohabbatein mahabharat win big at star parivar awards