हरमन बावेजाच्या पाठोपाठ बिपाशा बासूनेदेखील त्यांच्यातील प्रेमसंबंधांचा स्वीकार केला आहे. या बंगाली सुंदरीने त्यांच्यातील नातेसंबंधांबाबत सर्व वावड्यांना पूर्णविराम देत, त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमसंबंधांचा जाहीरपणे स्वीकार केला. हरमन आणि तिच्यात असलेल्या प्रेमसंबंधांचा स्वीकार करत टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, होय, नक्कीच मी आणि हरमन एकमेकांच्या प्रेमात आहोत. सरते शेवटी माझ्यापेक्षा अधिक चांगल्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे. माझ्यावर देवाने कृपादृष्टी केली आहे. या आधी हरमन बावेजानेदेखील बिपाशाबरोबरच्या आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. तो म्हणतो, आम्हाला दोघांनाही फिटनेसची आवड आहे. बऱ्याचशा आमच्या आवडी-निवडी सारख्याच आहेत. ती अतिशय साधी, सडेतोड आणि प्रामाणिक असून, खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी आहे. आम्हा दोघांसाठी कुटुंबीय आणि मित्रपरिवार अतिशय महत्वाचा आहे. दोघेही भावूक, काळजी घेणारे आणि साधेपणा जपणारे आहोत. बिपाशाच्या आयुष्यात हरमनने प्रवेश करण्याआधी तिचे आणि जॉन अब्राहमचे नऊ वर्षाचे जवळचे संबंध होते, जे काही वर्षांपूर्वी संपुष्टात आले.
होय, मी आणि हरमन एकमेकांच्या प्रेमात – बिपाशा बासू
हरमन बावेजाच्या पाठोपाठ बिपाशा बासूनेदेखील त्यांच्यातील प्रेमसंबंधांचा स्वीकार केला आहे. या बंगाली सुंदरीने त्यांच्यातील नातेसंबंधांबाबत सर्व वावड्यांना पूर्णविराम देत...
First published on: 19-02-2014 at 01:48 IST
TOPICSजॉन अब्राहमJohn Abrahamबिपाशा बासूबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 4 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes harman and me are a couple says bipasha basu