हरमन बावेजाच्या पाठोपाठ बिपाशा बासूनेदेखील त्यांच्यातील प्रेमसंबंधांचा स्वीकार केला आहे. या बंगाली सुंदरीने त्यांच्यातील नातेसंबंधांबाबत सर्व वावड्यांना पूर्णविराम देत, त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमसंबंधांचा जाहीरपणे स्वीकार केला. हरमन आणि तिच्यात असलेल्या प्रेमसंबंधांचा स्वीकार करत टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, होय, नक्कीच मी आणि हरमन एकमेकांच्या प्रेमात आहोत. सरते शेवटी माझ्यापेक्षा अधिक चांगल्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे. माझ्यावर देवाने कृपादृष्टी केली आहे. या आधी हरमन बावेजानेदेखील बिपाशाबरोबरच्या आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. तो म्हणतो, आम्हाला दोघांनाही फिटनेसची आवड आहे. बऱ्याचशा आमच्या आवडी-निवडी सारख्याच आहेत. ती अतिशय साधी, सडेतोड आणि प्रामाणिक असून, खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी आहे. आम्हा दोघांसाठी कुटुंबीय आणि मित्रपरिवार अतिशय महत्वाचा आहे. दोघेही भावूक, काळजी घेणारे आणि साधेपणा जपणारे आहोत. बिपाशाच्या आयुष्यात हरमनने प्रवेश करण्याआधी तिचे आणि जॉन अब्राहमचे नऊ वर्षाचे जवळचे संबंध होते, जे काही वर्षांपूर्वी संपुष्टात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा