स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवतेचा व सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहेत. सावित्रीबाईंची जयंती ३ जानेवारी आहे, त्याचं औचित्य साधून ‘सत्यशोधक’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशातच आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील इंग्रजी नाटक देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मालिकेने मारली बाजी; निर्माती शर्मिष्ठा राऊत झाली भावुक, म्हणाली, “मी आणि तेजसने…”

लेखिका सुषमा देशपांडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहीलं आहे की, मराठी रंगभूमी दिनानिमित्त जाहीर करायला आनंद होत आहे…लवकरच मराठमोळ सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांवरचे नाटक ‘व्हय मी सावित्रीबाई!’ इंग्रजीमध्ये येत आहे.

‘येस, आय एम सावित्रीबाई फुले’ या इंग्रजी नाटकात ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर झळकणार आहे. सावित्रीबाईंच्या भूमिकेत नंदिता पाहायला मिळणार आहे. ‘व्हय मी सावित्रीबाई’ या मराठी नाटकाचा अनुवाद शांता गोखले यांनी केला आहे.

हेही वाचा – Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत एंट्री; पाहायला मिळणार महत्त्वाच्या भूमिकेत

हेही वाचा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीत काय घडणार?, पाहा प्रोमो

दरम्यान, नंदिता पाटकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ या चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी नंदिताचा ‘बटर चिकन’ हा लघुपट प्रदर्शित झाला होता. १५ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या लघुपटात ती सुमन या भूमिकेत पाहायला मिळाली होती. यात तिच्याबरोबर अभिनेता सुशील इनामदार पाहायला मिळाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes i am savitribai phule new english drama coming soon sahkutumb sahaparivar fame nandita patkar play savitribai role pps
Show comments