छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत मोमोची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मोमो या भूमिकेमुळे मीरा घराघरात पोहोचली. मीरा चित्रपटसृष्टीत येण्याआधी योग प्रशिक्षक म्हणून काम करायची. योग प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत आल्यावर मीराला दोन वेळा कास्टिंग काऊचा सामना करावा लागला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मीराने हा खुलासा केला आहे. “मला दोनवेळा कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. तू नवी आहेस, तुला कोणी ओळखत नाही, त्यामुळे तुला हे करावं लागेल असं मला सांगण्यात आलं. मी नकार दिला. मेहनत करून संधी मिळवायची असं मला वाटतं. काम मिळवण्यासाठीचे शॉर्टकट मला मान्य नाहीत. थोड्या दिवसाचं फेम, एखादी सीरीज किंवा चित्रपट मिळवून फार काही साध्य होत नाही. एकाच माणसाकडून मला दोनदा असा अनुभव आला,” असं मीरा म्हणाली.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल
पुढे मीरा म्हणाली, “एकदा मला भूमिका देईल असं खोट सांगत त्याने हात पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्याच्या सरळ कानशिलात लगावली आणि निघून आले. त्यानंतर दोन वर्षं मी काही काम केले नाही. अशा प्रकारांमुळे कलाकार तणावात जावू शकतात. तुम्ही ठरवलं तर या सगळ्यापासून दूर राहू शकता. आता ओळखीतून आलेल्या कामालाच मी प्राधान्य देते.”
आणखी वाचा : घटस्फोटानंतर आमिर आणि किरण रावने लडाखमध्ये केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत अन्विता फलटणकर, शाल्व किंजवडेकर, अदिती सारंगधर मुख्य भुमिका साकारत आहेत. या मालिकेने थोड्याच काळात प्रेक्षकांची मने जिंकली आहे.