‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांचे लाखो चाहते आहेत. ते दोघं आता एकत्र आले आहेत आणि त्यांना एकत्र पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. हा आनंद त्या दोघांनी चाहत्यांसोबत एका वेगळ्या पद्धतीने शेअर केला आहे.

१९ डिसेंबर रोजी ओम आणि स्वीटू या दोघांनी एका लग्नात हजेरी लावली होती. या आधी त्यांनी १९ डिसेंबर रोजी कोणा कोणाची लग्न आहेत त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर शेअर करण्यास त्यांनी सांगितली. एवढचं काय तर त्यांच्यापैकी एकाच्या लग्नात उपस्थित राहू असे वचन देखील त्यांनी केले. त्यानुसार ओम आणि स्वीटू यांनी त्यांचे चाहते सौरभ आणि जुहीच्या लग्नात हजेरी लावली, त्यासोबत त्यांनी दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

ओम आणि स्वीटूला आपल्या लग्नात पाहून या जोडप्याला प्रचंड आनंद झाला. त्यांची प्रतिक्रिया आणि ओम स्वीटू सोबत त्यांचा एक फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला. चाहते आणि कलाकारमधील नातं घट्ट तयार करण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाची सगळीकडे स्तुती केली जात आहे.