झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली. या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे ती सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील ओम आणि स्वीटू ही जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत ‘मोहित’ हे पात्र साकारणारा अभिनेता निखिल राऊत याने याबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निखिल हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत निखिल राऊत याने खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचे मोहित हे पात्र चांगलच चर्चेत होतं. नुकतंच निखिलने त्याच्या फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.

निखिल राऊतची फेसबुक पोस्ट

“अखेर येऊ कशी तशी मी नांदायला या आमच्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं… मी गेली २० वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहे ही माझी २५ वी मालिका. खरं तर माझं पात्र ‘ मोहित ‘ हे डिसेंबर महिन्यातच संपलं होतं, परंतू ‘मी पुन्हा येईन ‘ ‘मी पुन्हा येईन ‘, असं प्रेक्षकांना वाटत होतं, मला देखील ते आवडलं असतं.”

“परंतू कथेचा शेवट जवळ आला आणि पुढच्या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. प्रेक्षकांनी ,चाहत्यांनी या मालिकेला, खलनायक असलो तरीही माझ्या ‘मोहित’ या पात्राला आणि आम्हा सर्वांच्याच पात्रांना खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभार.”

“तसंच या मालिकेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल Trump card productions निर्माते – तेजेंद्र नेसवणकर, सुवर्णा रसिक राणे आणि झी मराठी वाहिनीचे निलेश मयेकर सर, सोजल सावंत, रेणूका जोशी, सिद्धार्थ मयेकर तसेच संपूर्ण झी मराठी वाहिनीचेही मनापासून आभार. लेखक -सुखदा आयरे, पल्लवी करकेरा, किरण कुलकर्णी , समीर काळभोर तसेच , दिग्दर्शक -अजय मयेकर , हरिष शिर्के , Direction team, उत्तम production team ,माझे spot boys मित्र आणि माझ्या सर्व सहकलाकार मित्रांचे पण खूप खूप आभार, तुमच्या सगळ्यांमुळे मोहित हे पात्र साकारता आलं. खूप खूप धन्यवाद. माझे तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे, भेटूया लवकरच….”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत प्रेक्षकांना एक आगळी वेगळी कहाणी पाहायला मिळाली. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची हे प्रेक्षकांना फारच आवडले. मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचे लग्न झाले हे वळण प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. त्यानंतर आता स्वीटू ओमच्या बाळाची आई होणार आहे आणि अशाप्रकारे या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. या मालिकेच्या जागी लवकरच अभिनेता स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तू तेव्हा तशी असे या मालिकेचे नाव आहे.