‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. स्वीटूची आई म्हणजे तिची नलू मावशी आणि ओमच्या नात्यात असलेला विरोधाभास आता संपला आहे. आता स्वीटू आणि ओमच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. नुकताच स्वीटू आणि ओमच्या संगीतचा कार्यक्रम झाला. आता ओमचा लग्नातील लूक समोर आला आहे.
हा व्हिडीओ मराठी सीरियल ऑफिशीयल या इन्स्टाग्राम अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडीओत ओमने मरून रंगाचा शेरवानी फेटा परिधान केला आहे. त्याच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या लग्नाचे वेगवेगळे सोहळे सुरु झाले आहे. मेहंदी, संगीत, हळद असे सगळेच लग्नविधी खूप रंगणार आहेत.
आणखी वाचा : रिया कपूरच्या लग्नाच्या ६ दिवसानंतर आई सुनीता कपूरने शेअर केला फोटो, म्हणाल्या…
स्वीटूच्या आईने खूप प्रयत्न केला की ओमने त्यांच्या मुलीच्या आयुष्यात येऊ नये. मात्र, ओमने सगळ्या परीक्षा या न घाबरता त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवत दिल्या आणि अर्थात तो सगळ्या परीक्षा जिंकला. स्वीटूच्या आईने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. या विशेष भागाचे चित्रीकरण पार पडले आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर, शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत.