झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची सध्या चर्चा जोरात सुरूय. ही मालिका आता एक रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. ओम आणि स्विटूने आपल्या प्रेमाची कबुली नलू समोर दिलीय. त्यानंतर ओमच्या हट्टापुढे माघार घेत नलूने त्यांच्या लग्नासाठी ओमकडे एक अट घातली आहे. १५ दिवसांसाठी स्वतः कष्ट करून गरिबीत जगून २५ हजार रूपये कमवून दाखवलं तर ती दोघांच्या लग्नाला तयार होईल, अशी अट घातली आहे. या अटीनुसार आता तीन दिवस संपलेले असतात, तरीही ओमला कुठेच नोकरी मिळत नाही. अखेर पैसे कमवण्यासाठी ओम भाजीवाला बनून भाजी विकताना दिसणार आहे. तर ओमच्या या परिस्थितीत त्याला साथ देण्यासाठी स्विटू सध्या एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. मात्र या मालिकेत जी ब्यूटी पार्लरची मालकीण ममता काकी मुळे वेगळं चित्र दिसून येतंय. ममता काकीमुळे ज्या पद्धतीने मालिकेत ट्विस्ट आलाय तशाच तिच्या अभिनयाचाही एक ट्विस्ट आहे.

 

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
View this post on Instagram

 

A post shared by Varsha Padwal (@varsha10.02_official_account)

झी मराठीवरील घरघरात पाहिली जात असलेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत आतापर्यंत स्विटू, ओमकार, नलू, शकू, रॉकी ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. तसंच आणखी एक पात्र सध्या या मालिकेत स्कोप घेतंय ते म्हणजे स्विटू काम करत असलेल्या ब्यूटी पार्लरची मालकीण ममता काकी होय. नलूने दिलेली अट पूर्ण करण्यासाठी स्विटू सुद्धा ब्यूटी पार्लरमध्ये काम करून पैशांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करते. पण या ब्यूटी पार्लची मालकीण ममता काकी स्विटूला घालून पाडून बोलते. शिवाय मालविकाच्या सांगण्यावरून तिने नलू मावशीला स्विटूच्या लग्नासाठी मुद्दाम जाड मुलाचं स्थळ देखील सुचवलं होत. पण तुम्हाला माहितेय का, या सीनमधील ममता काकी यापूर्वी आणखी बऱ्याच मालिकेत झळकली आहे. त्यामूळे ही ममता काकी प्रेक्षकांनी ओळखीची झाली आहे.


‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ममता काकीची भूमिका अभिनेत्री वर्षा पडवळ हिने साकारलीय. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘श्रीमंत घरची सून’, ‘डॉक्टर डॉन’ , ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘देव पावला’, ‘मोलकरीणबाई’ , ‘जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये ती छोट्या-मोठ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे.

तिच्या भूमिका छोट्या असल्या तरी मालिकेत ट्विस्ट आणणाऱ्या आहेत. यापूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमध्ये त्यांनी लेडीज सिक्यूरिटी गार्ड बनून प्रेक्षकांसमोर आली होती. यात तिने गुरुनाथला दिलेला चोप हा प्रेक्षकांनी चांगलाच एन्जॉय केला होता.

अभिनेत्री वर्षा पडवळ हिने मालिका व्यतिरिक्त काही शॉर्ट फिल्म्समध्ये देखील काम केलंय. अभिनया सोबत त्यांना डान्सची देखील खूप आवड आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ममता काकी बनून त्या खडूस, स्वार्थी आणि घालून पडून बोलणाऱ्या महिलेच्या स्वभावाच्या दाखवल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्या खूप मनमिळावू स्वभावाच्या आहेत. मात्र, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेमुळे अभिनेत्री वर्षा पडवळ चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Story img Loader