झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची सध्या चर्चा जोरात सुरूय. ही मालिका आता एक रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. ओम आणि स्विटूने आपल्या प्रेमाची कबुली नलू समोर दिलीय. त्यानंतर ओमच्या हट्टापुढे माघार घेत नलूने त्यांच्या लग्नासाठी ओमकडे एक अट घातली आहे. १५ दिवसांसाठी स्वतः कष्ट करून गरिबीत जगून २५ हजार रूपये कमवून दाखवलं तर ती दोघांच्या लग्नाला तयार होईल, अशी अट घातली आहे. या अटीनुसार आता तीन दिवस संपलेले असतात, तरीही ओमला कुठेच नोकरी मिळत नाही. अखेर पैसे कमवण्यासाठी ओम भाजीवाला बनून भाजी विकताना दिसणार आहे. तर ओमच्या या परिस्थितीत त्याला साथ देण्यासाठी स्विटू सध्या एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. मात्र या मालिकेत जी ब्यूटी पार्लरची मालकीण ममता काकी मुळे वेगळं चित्र दिसून येतंय. ममता काकीमुळे ज्या पद्धतीने मालिकेत ट्विस्ट आलाय तशाच तिच्या अभिनयाचाही एक ट्विस्ट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा