गाणे गायल्याबद्दल गायक हनीसिंगवर कारवाई न केल्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला खडे बोल सुनावले. खंडपीठाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जसबीर सिंग आणि न्या. आर. के. जैन यांनी आज पंजाब सरकारला हनीसिंगविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गाण्यामुळे मान शरमेने खाली जात असल्याचेसुद्धा न्यायालयाने म्हटले आहे. हनीसिंगच्या या अश्लिल गाण्याविरुध्द अनेक ठिकाणी विरोध दर्शविला गेला होता. हनीसिंगने पंजाबी आणि इंग्रजी रॅप गाण्यांबरोबरच ‘खिलाडी ७८६’, ‘कॉकटेल’ आणि ‘लव्ह शव्ह ते चिकन खुराना’ सारख्या चित्रपटासाठी गाणी गायली आहेत.

Story img Loader