रॅपर यो यो हनी सिंग बॉलीवूडमध्ये फार प्रसिद्ध झाला आहे. आता तो अमिताभ बच्चन यांच्यासाठी ‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये गाणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे की, “यो यो हनी सिंग भूतनाथ रिटर्न्समध्ये गाणे गाण्यासाठी आला आहे…” फार कमी वेळात हनी सिंगने ‘कॉकटेल’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘बॉस’, ‘देढ इश्किया’ आणि ‘यारिया’ यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी म्हटली आहेत. शाहरुख खान, अक्षय कुमार या प्रसिद्ध अभिनेत्यांनंतर दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांच्यासाठी तो आता रॅपिंग करणार आहे. याचसोबत तो पॉर्न स्टार सनी लिओनीच्या रागिनी ‘एमएमएस २’साठीही गाणार आहे.
‘भूतनाथ रिटर्न्स’ हा २००८ सालातील भयानक हास्यविनोदी चित्रपट ‘भूतनाथ’चा सिक्वल आहे. यात जुही चावला आणि शाहरुख खान यांच्याही भूमिका होत्या.

Story img Loader