बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत रॅप केल्यानंतर आता यो यो हनी सिंग सुपरस्टार रणबीर कपूरसाठी गाणे गाणार आहे. रणबीरच्या आगामी ‘रॉय’ चित्रपटासाठी हे गाणे असणार आहे.
या गाण्यासंबंधीत गुप्तता बाळगली जात असून, दिग्दर्शक विक्रमादित्य सिंगने हे गाणे रणबीर कपूरवर चित्रीत केले जाणार असल्याचे सांगितले आहे. रणबीरसोबत काम करण्यासाठी हनी सिंगही फार उत्साहित आहे. पण, तो सदर गाण्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार की नाही यासंबंधी दिग्दर्शकाने काहीच माहिती दिलेली नाही. टी-सिरीजची निर्मिती असलेल्या ‘रॉय’ चित्रपटात अर्जुन रामपाल, जॅकलीन फर्नांडिसची भूमिका असून, १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आता रणबीर कपूरही करणार रॅप!
बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत रॅप केल्यानंतर आता यो यो हनी सिंग सुपरस्टार रणबीर कपूरसाठी गाणे गाणार आहे.
First published on: 11-03-2014 at 03:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yo yo honey singh to sing for ranbir kapoors roy