बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत रॅप केल्यानंतर आता यो यो हनी सिंग सुपरस्टार रणबीर कपूरसाठी गाणे गाणार आहे. रणबीरच्या आगामी ‘रॉय’ चित्रपटासाठी हे गाणे असणार आहे.
या गाण्यासंबंधीत गुप्तता बाळगली जात असून, दिग्दर्शक विक्रमादित्य सिंगने हे गाणे रणबीर कपूरवर चित्रीत केले जाणार असल्याचे सांगितले आहे. रणबीरसोबत काम करण्यासाठी हनी सिंगही फार उत्साहित आहे. पण, तो सदर गाण्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार की नाही यासंबंधी दिग्दर्शकाने काहीच माहिती दिलेली नाही. टी-सिरीजची निर्मिती असलेल्या ‘रॉय’ चित्रपटात अर्जुन रामपाल, जॅकलीन फर्नांडिसची भूमिका असून, १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा