एका चित्रपटात यशस्वी होवू देत मग बघ कशी मोठी झेप घेते ते असा आशावाद ठेवणा-या अनेकांतील एक योगिता दांडेकर आहे.
‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘दुर्गा म्हणत्यात मला’ अशा चित्रपटातून लहान सहान भूमिका साकारल्यावर आता ‘जरा संभाल के’ मध्ये तिला नायिकेची आव्हानात्मक भूमिका मिळाली आहे.
ती सांगत होती, एक मोठी भूमिका मिळाल्याशिवाय आपली क्षमता व अस्तित्व सिध्द होत नाही, असे माझ्या लक्षात आले. शरदसिंग ठाकूर दिग्दर्शित ‘जरा संभाल के’ या चित्रपटात नयना ही व्यक्तीरखा त्यासाठी फायद्याची ठरावी असे मला वाटते. लातूर भूकंपग्रस्तांतील काही कुटुंबे नांदेडला स्थायिक झाली, त्यातील नयना नावाची एक स्त्री दुर्दैवाने शरिरविक्रय करते, अशाच वातावरणातून गावात एड्सचा धोका निर्माण होतो, याभोवती हा चित्रपट आहे. माझ्यासोबत एहसान खान इत्यादींच्या भूमिका आहेत. पण माझा महत्वाकांक्षी स्वभाव पाहता माझा हा चित्रपट माझ्या फायद्याचा ठरावा असे वाटते. फक्त त्याचे प्रदर्शन पुढे जात आहे याचे मला वाईट वाटते, योगिता दांडेकर प्रांजळपणाने म्हणाली.
योगिताची धडपड कधी फळेल?
एका चित्रपटात यशस्वी होवू देत मग बघ कशी मोठी झेप घेतो ते असा आशावाद ठेवणा-या अनेकांतील एक योगिता दांडेकर आहे.
First published on: 02-09-2013 at 07:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogita dandekar working hard