‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, सगळीकडे सध्या त्याचीच चर्चा आहे. बऱ्याच वादानंतर, बॉयकॉट ट्रेंडनंतर चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. लोकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी हा चित्रपट २५ कोटी कमवेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ५ प्रादेशिक भाषेत हा चित्रपट प्रदर्शित केल्याने याकडून खूप अपेक्षा आहेत. 3D तसेच 2D मध्ये तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळेल. पण एक आठवडा वाट पाहिलीत तर तुम्ही हा चित्रपट केवळ ७५ रुपयांत पाहू शकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१६ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी १६ सप्टेंबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे अवचित्य साधून तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निर्णय घेतला आहे.

१६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांना चित्रपटाच्या एका तिकिटासाठी फक्त ७५ रुपये आकारण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया घेतला आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज, सिटीप्राइड या बड्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे ४ हजार चित्रपटगृहात ७५ रुपयात चित्रपटाची तिकिटं विकली जातील. म्हणजेच ५०० किंवा १००० रुपये खर्च न करता या १६ सप्टेंबरला रणबीर आलियाचा ब्रह्मास्त्र निव्वळ ७५ रुपयांत तुम्हाला पाहता येईल.

आणखी वाचा : “मी गांधीवादी नाही, तर मी…” अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत

याबरोबरच असोसिएशनने स्पष्ट केलं आहे की “७५ रुपयांना तिकिटे देण्याच्या योजनेत सहभागी होणारे थिएटर्स त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर तपशील याबद्दल अधिक माहिती शेअर करतील. तसेच तिकिटांची किंमत फक्त ७५ रुपये असेल, पण बुकिंग अॅप्स अतिरिक्त शुल्क आकारू शकतात.”