पाकिस्तानी कलाकारांनी बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या विरोधावर अभिनेता सलमान खानने त्याचे मौन सोडले आहे. कला आणि मनोरंजन यांना सीमा नसतात, त्यांना राजकारणाशी जोडू नका, असे सलमानने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम शिवसेनेने रद्द करावयास लावला होता. तसेच, बॉलीवूडमध्ये आगामी चित्रपटांमध्ये काम करत असलेल्या फवाद खान आणि महिरा खान हे पाकिस्तानी कलाकारही शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत. यावर सलमान म्हणाला की, आताच्या जगात सर्व काही डिजीटल झाले आहे. भारतीयांना हरत-हेचा मनोरंजनात्मक कार्यक्रम बघावसा वाटतो, यात पाकिस्तानी कार्यक्रमांचाही समावेश आहे. याचाचं अर्थ कला आणि मनोरंजनाला सीमा नाही आहे. मनोरंजनाचे मूल्यांकन हे लोकांना काय पाहायचे आहे यावर होते. जर कोणाले वाटते की पाकिस्तानी कलाकार एखादी भूमिका चांगली वटवू शकतो तर त्याच्यावर कोणीही मर्यादा नाही टाकू शकत. पाकिस्तानमध्ये बॉलीवूडचे अनेक चाहते असून त्या देशातून आपल्याला चांगले उत्पन्नही मिळते.
पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते, भारतीय सैनिकांच्या हत्या केल्या जातात आणि सीमेवर गोळीबारही होतो. त्यामुळे पाकिस्तानशी खेळ किंवा सांस्कृतिक संबंधही ठेवले जाऊ नयेत, अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे.
पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम करण्यास तुम्ही रोखू नाही शकत- सलमान खान
कला आणि मनोरंजन यांना सीमा नसतात, त्यांना राजकारणाशी जोडू नका, असे सलमानने म्हटले आहे.
आणखी वाचा
First published on: 03-11-2015 at 12:31 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसलमान खानSalman Khan
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You cant stop pak artists from working in bollywood salman khan