गेल्या शतकात जगभरातील साऱ्याच चित्रपटांनी नायकाच्या सूडक्षमतांबाबत प्रेक्षकांच्या डोक्यात भलतेच ठोकताळे ठोकून-ठोकून बसविले. सिंगल फसली असताना प्रचंड आरडा-ओरड करून फक्त पन्नासेक लोकांना हाणामारीत माती दाखविणाऱ्या ब्रुस ली किंवा जॅकी चान यांच्या मारकौशल्याबाबत मार्शल आर्टचे कारण तरी होते. अरनॉल्ड आणि सिल्व्हस्टर स्टॅलोन यांच्या खलनिग्रहणाय प्रवृत्तीत त्यांच्याअतिरिक्त व्यायामाने घडविलेल्या शरीरयष्टीचे कारण होते. आपल्याकडे ‘अँग्री यंग मॅन’ ते ‘परफेक्शनिस्ट’ ही बिरूदे मिरविणाऱ्या अभिनेत्यांच्या सिनेमातील हाणामारीचे सविनोद प्रकार पाहिले तर त्यांच्या शरीरात ‘युद्धकला’, ‘विजयकला’ या इनबिल्ट असल्याचे लक्षात येईल. शरीरक्षमतांचे आणि गुरूत्वाकर्षणाचे नियम सतत टाळणाऱ्या नायकांच्या सूडाग्रहाचे सिनेमे आपल्या प्रेक्षकांच्या बुद्धीची कक्षा अरूंद करण्यात महत्त्वाची ठरली. म्हणजे सत्तरोत्तरीच्या जगतातील सूडपटांतील खलवधाची पारंपरिक आखणी दोन-हजारोत्तर आजच्या काळातही तशीच राहिली. खलनायकासाठी नायकाने वापरलेल्या (कुत्ते-कमीने : प्राणीवाचक, ‘खून पिजाऊंगा’ : व्हॅम्पायरवाचक) शिव्या-संज्ञांमध्ये फक्त काहीप्रमाणात बदल झाला. नायकाकडून ‘गोली मार भेजेमे’ प्रवृत्ती अंगिकारणाऱ्या वास्तववादी सिनेमांना आपल्याकडे कलात्मकतेचे लेबल लागते आणि फावल्या वेळात सूडासोबत रोमान्स, समाजकार्य,वाद्यनिपुणता आणि गानकौशल्य या गुणांची आराधना करणाऱ्या मल्टीटास्कर नायकांच्या व्यक्तिरेखांचे सिनेमे ब्लॉकबस्टर्स गटांत मोडतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा