स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
हिपहॉप
जे उपलब्ध आहे त्यातून किंवा कमीत कमी वाद्यांचा वापर करून, स्वत:च्या भाषेत सामाजिक आव्हानांवर प्रकाश टाकणे, भाष्य करणे, प्रोत्साहन देणे, टीका करणे यातून १९७० मध्ये हिपहॉपचा उदय झाला. मुंबईच्या कानाकोपऱ्यात असे अनेक हिपहॉप कलाकार गेल्या काही वर्षांत तयार झाले आहेत. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटाच्या निमित्ताने मुंबईतल्या हिपहॉपची ओळख करुन देणारा हा लेख.
मुंबई.. स्वप्नांचे शहर. या शहरामध्ये लाखो लोक आपले पोट भरण्यासाठी येतात आणि इथलेच होऊ जातात. पोटापाण्याची खळगी भरणाऱ्या उद्योगांशिवाय मुंबईची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे मुंबईची संस्कृती. आता संस्कृती म्हटल्यावर पारंपरिकच असं नाही. या शहराच्या चेहऱ्याप्रमाणे इथली संस्कृतीही बहुपेडी आहे. हिपहॉपदेखील याच संस्कृतीचा एक भाग झाले आहे. ‘गली बॉय’ चित्रपटात मुंबईतील दोन जगप्रसिद्ध रॅपर्सची कथा मांडण्यात आली आहे. मुळात मुंबईमध्ये हिपहॉप ग्रुप मागील अनेक वर्षांपासून आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ते सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत इतकंच. रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या सिनेमातील गाणी सध्या चच्रेचा विषय ठरत असतानाच हिपहॉप म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. अनेकांनी तर ज्या डिवाइन आणि नॅझीच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे त्यांचे नावच पहिल्यांदा ऐकले आहे. अनेकांना हिपहॉप म्हणजे रॅप साँग आणि डान्स इतकचं ठाऊक आहे. पण खरोखरच हिपहॉपमधील रॅप साँग म्हणजे काय, तर मुंबईमधील धारावीसारख्या जागीदेखील हिपहॉप संस्कृती रुजली आहे, त्यातही खास करून रॅप गाणी तयार करणारा बॅण्ड इथे आहे. मुंबईमधील लोकप्रिय हिपहॉप कलाकार आणि हिपहॉपमधून हे तरुण काय सांगू पाहत आहेत हे समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
हिपहॉप म्हणजे काय?
हिपहॉप ही संकल्पना अमेरिकेत १९७० च्या आसपास जन्माला आली. हिपहॉप चळवळ ही अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामधील ब्रोनेक्स येथे सुरू झाली. अनेकदा हिपहॉप हा शब्द केवळ गाण्यांसाठी त्यातही खास करून रॅप म्युझिक म्हणून वापरला जातो. मात्र हिपहॉपमध्ये रॅिपग म्हणजेच यमक जुळवून बनवलेली शब्दरचना योग्य रीतीने सादर करण्याची कला, डिजेइंग आणि डिजे मिक्सर्स, बिबॉइंग आणि ब्रेकडान्स, ग्राफिटी, बिटबॉिक्सग, हिपहॉप भाषा आणि हिपहॉप फॅशन अशा वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश होतो. एका विशिष्ट समाजावर कायमच होणारा अन्याय किंवा दिली जाणारी कमीपणाची वागणूक झुगारून टाकण्यासाठी ऐंशीच्या दशकामध्ये अमेरिकेत हिपहॉप चळवळीची सुरुवात झाली. आफ्रिकी-अमेरिकन लोकांनी आपल्या घरी होणाऱ्या पाटर्य़ामध्ये तसंच बाहेर होणाऱ्या सोशल गॅदिरगमध्ये गाण्यांच्या माध्यमातून कमीत कमी वाद्यांच्या मदतीने बिट्सवर गाणी सादर करण्यास सुरुवात केली. समाजामधील वेगळा पडलेला गट म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जायचे त्या लोकांमध्ये ही कला रुजू लागली आणि फुलू लागली. यामधील गाण्यांचे विषय हे प्रोत्साहन देणे, समोरच्या गटाच्या चुका दखवणे, नियम झुगारून लावणे तसेच राजकीय आणि सामाजिक भाष्य करणे अशा स्वरूपाचे असायचे. यामधूनच हिपहॉपचा जन्म झाला.
आज मुंबईसारख्या शहरामध्ये मागील दशकभरापासून हिपहॉपची चळवळ उभी राहत आहे त्यामागेही हीच संकल्पना आहे. मुंबईमध्ये एकीकडे अतिश्रीमंती आहे, दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांसाठीही संख्या भरपूर आहे. या झगमगाटाच्या दुनियेमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी धारावीसारख्या परिसरातील कलाकारांना सहज व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा कलाकारांनी मग आपल्या आयुष्यातील व्यथा आणि आजूबाजूच्या घटना गाण्यांच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात केली. अर्थात ही गाणी बिट्सवर गायली जायची. यासाठी मग उपलब्ध असतील त्या गोष्टींमधून ताल तयार केला जायचा. यातूनच हळूहळू मुंबईमधील धारावीसारख्या शहरामध्ये हिपहॉप चळवळीची सुरुवात झाली. मुंबईमधील सर्वात जुन्या हिपहॉप कलाकारांपकी एक असणारा धवल परब सांगतो, ‘हिपहॉपची मुंबईमध्ये सुरुवात धारावीत झाली असं नाही म्हणता येणार. पण धारावीमधील हिपहॉप चळवळ ही लक्ष वेधून घेणारी आहे. येथील तरुणांमध्ये अनेक कला आहेत, तशीच त्यांनी रॅप साँग्स बनवण्याची कलाही शिकून घेतली आहे. आज जगभरातील हिपहॉप चाहते मुंबईमधील हा परिसर केवळ जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून नाही तर तेथील कलाकारांसाठीही ओळखतात. हेच या चळवळीचे यश आहे.’
मुंबईमधील धारावीसारख्या भागातून डिवाइन आणि नॅझीसारखे कलाकार हिपहॉप क्षेत्राला मिळाल्यानंतर हा ट्रेण्ड वाढलेला दिसत आहे. मुळात गरिबीमध्ये दिवस काढलेले कलाकार आपल्या गाण्यांमधून गरिबीमधील जीवन, सामाजिक तसेच आíथक दरी, त्यांचे प्रश्न यासारख्या गोष्टी गाण्यांमधून जगासमोर ठेवतात. आता तुम्ही रणवीरच्या सिनेमातील प्रत्येक गाणे ऐकून बघा. उदाहरणार्थ, ‘अपना टाइम आऐगा’.. या गाण्यामधील शब्द हिपहॉप स्टाइल असले तरी गाण्यामध्ये ‘सब्र का फल मीठा होता है.’ हाच संदेश देण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या गाण्याबद्दल बोलायचे झाल्यास अशा हिपहॉप गाण्यामध्ये तर धारावीसारख्या परिसरातून येणाऱ्या कलाकारांसमोरील सामाजिक आव्हानांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करताना झालेला दिसतो.
मुंबईमधील हिपहॉपवर बीबीसीपासून परदेशी निर्मात्यापर्यंत अनेकोंनी माहितीपट तयार केले आहेत. यामध्येही विशेषकरून मुंबईमधील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये राहणारा तरुण हा त्याच्या मागण्या आणि परिस्थिती गाण्याच्या माध्यमातून व्यक्त करण्याच्या उद्देशाने हिपहॉप चळवळीच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घटकाचा आवाज म्हणून पुढे येत असल्याचे म्हटले आहे. हिपहॉप मुंबईमधील धारावीसारख्या जागी लोकप्रिय होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापकी महत्त्वाचे कारण म्हणजे हे संगीत तयार करण्यासाठी खूपच कमी खर्च येतो. एक मायक्रोफोन, गाण्यासाठी ताल आणि रेकॉìडगसाठी रेकॉर्डर इतकेच. तर गातानाचे चित्रीकरण करून व्हिडीओ तयार करणे हे आजच्या मल्टिमीडियाच्या जगात अगदी सोपे झाले आहे. केवळ मुंबईच नाही तर दिल्ली, बंगळूरुसारख्या शहरांमध्येही स्थानिक भाषेमधील हिपहॉप ट्रेण्ड चांगलाच रुळल्याचे दिसत आहे. केवळ इंग्रजी भाषेमध्ये गाण्याऐवजी स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषेचा मिलाफ करून तयार केलेले गाणे हे अधिक आकर्षक होते. या गाण्यांमधील स्थानिक शब्द आणि शब्दरचना भाव खाऊन जातात. त्यातही गाणारे हिपहॉप आर्टस्टि हे स्वानुभवातून लिहीत असल्याने त्यांच्या बोलीभाषेतील शब्द ते अनेकदा या गाण्यांमध्ये अगदी लीलया पेरतात आणि मग ते शब्द तरुणाईला नव्याने कळतात.
धवल परब सांगतो की, हिपहॉपमुळे कलेच्या माध्यमातून मुले लोकप्रिय होतात. हिपहॉप अनेकदा समाजातील तळच्या स्तरातील लोकांना आकर्षित करते. हिपहॉपच्या माध्यमातून इतकेच सांगितले जाते की तुम्ही समाजातील कोणत्या स्तरातून आलेले आहात यापेक्षा तुमच्यामध्ये कला असेल तर तुम्ही ती तुमच्या पद्धतीने जगासमोर सादर करा. त्यामुळे ही कला म्हणजे कविता करण्यासारखे आहे. कविता सुचण्यासाठी कवित्व उपजतच असावे लागते, तसे हिपहॉप हे स्वत:च्या अनुभवामधून मिळालेले ज्ञान. हिपहॉपपकी कोणत्याही प्रकारातून खास करून गाण्याच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले जाते. हिपहॉपचा इतिहास पाहिला तर असे दिसेल की सगळे नावाजलेले कलाकार हे दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या समाजाचा भाग आहेत. त्यांनी आपल्या समस्या आणि प्रश्नांना हिपहॉपच्या माध्यमातून वाचा फोडली आणि त्यांच्याशी लोकांना जोडून घेता आल्यामुळे ते कलाकार लोकप्रिय झाले. धारावी असो किंवा अमेरिकेमधील संस्कृती, एक गोष्ट यामध्ये समान आहे, हे हिपहॉपर ज्या सामाजिक जडणघडणीमधून येतात ती व्यवस्था. आज हिपहॉपमुळे धारावीसारख्या भागातील तरुणांना त्यांची कला योग्य प्रकारे सर्वासमोर आणण्याचे माध्यम मिळाले आहे. यामुळे तेथील तरुण गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. चोऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा तुमच्यातील कला वापरून तुम्ही लोकप्रिय होऊ शकता आणि त्याच वेळी तुमचे प्रश्न जगासमोर मांडू शकता असा विश्वास आता येथील तरुणांमध्ये तयार झाल्याचे धवल सांगतो. मुंबई विद्यापीठानेही हिपहॉपचा अभ्यासक्रम सुरू केला असून तेथे अगदी ग्रॅफिटीपासून ते रॅप साँग्सपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या जातात. याबद्दलची अधिक माहिती विद्यापीठाच्या साइटवर उपलब्ध आहे.
धारावीमधून मोठे झालेले हिपहॉप कलाकार आता तेथील इतर तरुणांना या क्षेत्राकडे वळण्यासाठी मदत करत असल्याचे मागील १५ वर्षांपासून हिपहॉप क्षेत्रात असणाऱ्या धवलने सांगितले. धारावीमध्ये ‘आफ्टर स्कूल हिपहॉप’ उपक्रम राबवला जातो. यामध्ये शाळेनंतर शाळेमध्येच तेथील लोकप्रिय हिपहॉप कलाकार तसेच शहरातील इतर हिपहॉप कलाकार आळीपाळीने भेट देऊन मुलांना रॅप साँग्स आणि इतर हिपहॉप प्रकार मोफत शिकवतात. शाळेनंतरच्या वेळात ही मुलं आपल्यातील कलाकाराचा शोध घेण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसते. या मुलांना तेथे हिपहॉप काय आहे याची माहिती दिली जाते. पण ही कला शिकवता येत नाही, कारण हिपहॉपमधील अनुभव हे खासगी आयुष्याशी संबंधित असतात. आज कोणतेही हिपहॉप गाणे ऐका, ते सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करते, कलाकाराचा संघर्ष मांडते. त्यामुळेच हिपहॉप क्लासरूममध्ये बसून शिकण्याची कला नाही, असं धवल म्हणतो. जितके आपण खासगी लिहितो तितके ते वैश्विक होते असे म्हणतात, हिपहॉपचेदेखील असेच आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास ‘अपना टाइम आऐगा’ हे गाणे प्रत्येक जण स्वत:शी रिलेट करतो. ‘‘हिपहॉपमुळे स्वत:ला समजून घ्यायला मदत होते. तुम्ही स्वत:चे अनुभव रॅपच्या माध्यमातून जगासमोर मांडताना स्वत:ला आणखीन जाणून घेता,’’ असे धवल सांगतो.
वेगळी भाषा
हिपहॉपमध्ये अनेक प्रकार असले तरी मुख्यपणे रॅप साँग म्हणजे हिपहॉप असं मानलं जातं. या गाण्यामधील शब्द आणि ही गाणी तयार करून सादर करणारे तरुण यांचा स्वत:चा शब्दकोश आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या शब्दांचा अंदाज ‘गली बॉय’ सिनेमाच्या गाण्यांमधून येतोच. अनेक जण तर आपली टोपणनावही याच भाषेमधून ठेवतात. मवाली, बंटाय, हार्ड है, एमसी (माईक कमांडर म्हणजेच गायक) यांसारखे शब्द आता सामान्यांच्याही ओळखीचे झाले आहेत.
सिनेमामुळे फायदा होणार
‘गली बॉय’ सिनेमाचा हिपहॉप चळवळीला फायदा होईल, असं धवल सांगतो. सिनेमाच्या माध्यमातून ही चळवळ सामान्यांपर्यंत पोहोचेल. मुळात सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यानंतर आता अनेक जण मुंबईमधील हिपहॉपबद्दल बोलू लागले आहेत. हिपहॉप सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्याने अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या हिपहॉप कलाकारांना ओळख मिळेल. आज या सिनेमामधील अनेक हिपहॉप कलाकार हे धारावीतील आहेत हे लक्षात घ्याला हवं. या सिनेमामुळे शहरातील हिपहॉप कलाकारांना ओळख मिळून त्यांस फायदा होईल. पर्यायाने त्यांची गाणी म्हणजेच त्यांचे प्रश्न आणि म्हणणे मोठय़ा समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असं मत धवलने व्यक्त केलं.
तिकीटबारीवर हा सिनेमा काय करतो हे बाजूला ठेवलं तरी सिनेमामुळे मुंबईतील ही कल्लाकारी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि या चळवळीला अधिक बळ मिळेल हे मात्र नक्की.
याशिवाय देशभरातील लोकप्रिय रॅपर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बंगळूरुमधील विग्नेश शिवानंद ऊर्फ ब्रोदा व्ही (९७ हजार फॉलोअर्स), दिल्लीचा एम. सी. प्रभा दीप (११ हजार फॉलोअर्स), दिल्लीचाच कृष्णा कौल (ऊर्फ क्रिसना, नऊ हजार फॉलोअर्स ), बंगळूरुचा सुमुख म्हैसूर ऊर्फ स्मोकी द घोस्ट, केरळमधील स्ट्रीट अकॅडमिक्स, ईशान्य भारतातील खास बल्ड्स (१७ हजार फॉलोअर्स), तमिळमधीलच मदुराई सोलजोऊर तसेच सोफिया अश्रफ, दिल्लीचा शाश्वत मिश्रा ऊर्फ द क्विकसॉटिक, सिधे मौत ग्रुप आणि हरियाणवी भाषेतील रॅप करणारा प्रधान (अडीच लाख फॉलोअर्स) या रॅपर्सची नावे आवर्जून घ्यावी लागतील.
मुंबईतले हिपहॉप
मुंबईमध्ये सध्या २० ते २२ लोकप्रिय हिपहॉप कलाकार आहेत, तर हिपहॉप आणि रॅप साँग्स तयार करणाऱ्या तरुणांची संख्या पाच ते सहा हजारांच्या घरात आहेत. बहुतांश तरुण छंद म्हणून याकडे पाहतात. गाणी तयार करतात आणि समाजमाध्यमाच्या साहाय्याने लोकांपर्यंत पोहोचवतात. काही नावाजलेले कलाकार, ग्रुप मागणीनुसार विविध ठिकाणी आपली कला सादर करतात. मुंबईतील काही लोकप्रिय हिपहॉप कलाकार आणि ग्रुपची यानिमित्ताने ओळख.
स्लमगॉड्स
धारावीमधील हिपहॉप संदर्भात काम करणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या ग्रुपपकी एक. २००९ साली तयार झालेला हा ग्रुप खऱ्या अर्थाने धारावीमधील हिपहॉप चळवळीचा कणा ठरला. हिपहॉपच्या मदतीने गरिबीमध्ये राहूनही आयुष्यामधील सकारात्मकता धारावीतील लोकांना आपल्या गाण्यांमधून दाखवण्याचे काम ‘स्लमगॉड’ने केले. केवळ गाणी तयार करण्याऐवजी गाणी गाणारे नवीन हिपहॉप कलाकार धारावीमध्येच तयार करणे, लहान मुलांना हिपहॉपची गोडी लावणे, त्यांच्यासाठी हिपहॉपचे मोफत क्लासेस घेणे, ग्राफिटी क्लासेस घेणे, जॅम सेशन्स भरवणे अशी सर्वच कामे हा ग्रुप करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिपहॉप कलाकारांनीही यांच्या कामाची स्तुती केली आहे.
डोपीडॅलीज
यू-टय़ूबसारखी माध्यमे लोकप्रिय होण्याआधीपासूनच धारावीमधील टोनी सॅबेस्टियन (ऊर्फ सायको), राजेश राधाकृष्णन (ऊर्फ डोप डॅडी), अॅग्नेल अविनाश बेन्सन (ऊर्फ बेन झेड) या तिघांनी हा ग्रुप सुरू केला होता. त्यांनी कोक स्टुडियो, यू-टय़ूब फॅनफेस्टसारख्या मंचावरून सादरीकरण केले आहे. त्यांचे यू-टय़ूबवर १५ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सेव्हन बंटाइज
२०१४ साली सात जणांनी हा रॅपर्सचा ग्रुप सुरू केला. डिवाइन आणि इतर स्थानिक रॅपर्सकडून प्रेरणा घेऊन शाळेपासून एकत्र असणाऱ्या सात मित्रांनी हा ग्रुप तयार केला. हा ग्रुप मराठी, िहदी, तमिळ आणि इंग्रजी भाषेत रॅप गाणी तयार करतो. त्यांच्या यू-टय़ूब चॅनेलला सध्या ३३ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
दीपा उन्नीकृष्णन (ऊर्फ डी. एमसी)
स्त्री-पुरुष समानता, महिला सबलीकरण यासारख्या गंभीर विषयांवर ती आपल्या रॅपमधून भाष्य करते. घरच्यांचा विरोध झुगारून या श्रेत्रात आलेली दीपा ही अवघी २२ वर्षांची असून रॅप गायल्याने मला माझ्या पद्धतीने व्यक्त होता येतं, म्हणून मी गाते असं ती म्हणते. सध्या तिच्या यू-टय़ूब चॅनेलला पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मुंबईज फायनेस्ट
मुंबईमधील अनेक हिपहॉपर्सना आपल्या कामातून प्रोत्साहन देऊन त्यांना या क्षेत्राकडे वळण्यास आदर्श ठरलेला हा ग्रुप शहरातील सर्वात जुन्या हिपहॉपर ग्रुपपकी एक आहे. ‘नेटफिक्स’वरील ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ या चित्रपटातील ‘यात्री कृपया ध्यान दे..’ हे गाणं याच ग्रुपने तयार केलं आहे.
अलकेश सुतार (ऊर्फ एमसी मवाली)
स्वदेशी ग्रुपमधील हे मराठमोळं नाव मुंबई हिपहॉपच्या वर्तुळात बरेचं लोकप्रिय आहे. टोपणनाव मवाली असलं तरी अलकेश सामाजिक विषयांवर मराठी रॅप तयार करणारा चेहरा म्हणून ओळखला जातो. त्याने दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर तयार केलेलं ‘लाज वाटते काय?’ गाणं बरंच गाजलं होतं. त्यानंतर आलेलं ‘हिपहॉप शिका’ हे गाणंही चांगलंच गाजलं.
धम्रेश परमार (ऊर्फ एमसी तोडफोड)
स्वदेशी ग्रुपचा सदस्य आणि ‘मवाली’ ग्रुपमधील जोडीदार असणारा धम्रेश हा सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारी गाणी लिहितो. हा गुजरातीमध्येही रॅप करतो.
धवल परब (ऊर्फ डेव्हिल)
मुंबईमधील महत्त्वाच्या हिपहॉप रॅपर्सपकी आणखीन एक मराठी नाव. शहरातील जुन्या रॅपर्सपकी एक असणारा धवल त्याच्या ‘कडकी’, ‘चल भक’, ‘भलती सोच’ आणि ‘अॅण्टीसोशल’ या गाण्यांसाठी ओळखला जातो.
डीन सेकीरा
१४ व्या वर्षी तिने ‘रॅण्डम’ नावाचं आपलं पहिलं हिपहॉप साँग रेकॉर्ड केलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. आज वयाच्या २२व्या वर्षांपर्यंत तिने प्रीतम, मोहित चौहान, मिका सिंगसारख्या गायकांबरोबर काम केलं आहे.
शहानवाज खान (ऊर्फ ब्रोदा हूड)
२०१६ साली याने आपला पहिला आल्बम प्रदíशत केला असला तरी तो २०१२ पासून या क्षेत्रात आहे.
एमसी मनप्रीत कौर
१५ वर्षांची असताना तिने कॉलेजमधील कार्यक्रमात गाणे सादर केले आणि त्यानंतर तिने कधी मागे पाहिलेच नाही.
स्वदेसी
२०१३ पासून मुंबईमधील हा बॅण्ड अनेक भाषांमध्ये रॅप साँग्स सादर करतो. आपल्या मुळाशी जोडलेले राहा असा संदेश देणारी त्यांची गाणी प्रस्थापितांना विरोध दर्शवणारी असतात.
बिलाल शेख ऊर्फ एमीवे बंटाय
२०१४ साली ‘और बंटाय’ या गाण्याने बिलालने प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या यू-टय़ूब चॅनलला ३२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अंकुर जोहर (ऊर्फ एंकोर)
२०१३ साली याने रेडिओ सिटी फ्रीडमचा सर्वोत्तम भारतीय हिपहॉपर पुरस्कार (पिपल्स चॉइस) जिंकला. त्यानंतर त्याने २०१५ साली नऊ गाण्यांचा आपला पहिला आल्बम प्रकाशित केला. त्यांनतर त्याने मागील वर्षी आणखीन एक आल्बम प्रकाशित केला.
सौजन्य – लोकप्रभा