गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बदो बदी’ या गाण्याची खूप चर्चा होती. अनेक रील्समध्ये हे गाणं ऐकायला मिळत होतं. सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या या गाण्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानने गायलेलं हे गाणं युट्यूबने हटवलं आहे. त्यामागचं कारणही समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटवरील गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेलं ‘बदो बदी’ हे गाणं आता लोकांना यूट्यूबवर ऐकता येणार नाही. चाहत फतेह अली खानने गायलेलं हे गाणं यूट्यूबने डिलीट केलं आहे. हे गाणं जुन्या काळातील ‘अख लडी बदो बदी’ या गाण्याचं रिमेक गाणं होतं. हे गाणं खूप मजेदार शैलीत गायलं होतं. याला यूट्यूबवर कमी वेळेतच तब्बल १२८ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.

Video: कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला बक्षीस देणार, व्यावसायिकाने केली घोषणा

या गाण्यामुळे चाहत फतेह अली खानला खूप लोकप्रियता मिळाली. गाण्यातील सूर आणि चाहत फतेह अली खानचा अभिनय मजेदार होता, त्यामुळे गाणं खूप व्हायरल झालं. त्यावर केवळ पाकिस्तानीच नाही तर भारतीय लोकही रील बनवत होते. हे गाणं सर्वांच्याच ओठांवर होतं, इतकं ते लोकप्रिय झालं. पण यूट्यूबने अचानक हे गाणं डिलीट केलं आहे. ज्यांना हे गाणं आवडत असेल त्यांची ही बातमी वाचून नक्कीच निराशा होईल.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

युट्यूबने का हटवलं ‘बदो बदी गाणं’?

अहवालांनुसार, युट्यूबने कॉपी राइट्समुळे ही कारवाई केली आहे. हे गाणं बेकायदेशीरपणे, परवानगीशिवाय गायलं आणि नंतर यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं, असं म्हटलं जात आहे. याच कारणाने तब्बल १२८ मिलियन व्ह्यूज असलेलं हे गाणं युट्यूबने डिलीट केलं आहे.

‘हॅलो छायाजी, मैं…’, जेव्हा कोकणात असलेल्या छाया कदमांना तब्बूने केला होता फोन

गायकाला कोसळलं रडू

युट्यूबने हे गाणं हटवल्यानंतर चाहत फतेह अली खानला रडू कोसळलं. त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, ‘बदो बदी’ हे गाणं गाणाऱ्या चाहतने हे एकमेव गाणं गायलेलं नाही. नुकतीच त्याची अनेक गाणी एकापाठोपाठ एक रिलीज झाली. सध्या तो नुसरत फतेह अली खान यांच्या ‘जय तू आंखियां दे सामने नही रहना’ या प्रसिद्ध गाण्याच्या रिमेकमुळे चर्चेत आहे. ‘पाओ पाओ पाओ’ हे गाणंही त्याने गायलं आहे. याशिवाय तो लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. ईदच्या मुहूर्तावर तो चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे, अशीही चर्चा आहे. ‘बदो बदी’ या गाण्याने चाहतला खूप लोकप्रियता मिळवून दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtube deleted bado badi song 128 million views singer chahat fateh ali khan cried hrc