लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत घरातील प्रत्येकाला अगदी सहज युट्यूब हे अ‍ॅप वापरता येतं. चित्रपटांचे ट्रेलर, गाणी, मालिकांचे एपिसोड्स, आपल्या आवडत्या इन्फ्लुएन्सर्सचे डेली ब्लॉग्स या सगळ्या गोष्टी युट्यूबवर उपलब्ध आहेत. मात्र, आता व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबमध्ये एक मोठा बदल होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता येत्या काळात युट्यूब अपग्रेड होणार आहे. आता युट्यूब सबस्क्रिप्शनवर आधारित सामग्रीवर अधिक लक्ष केंद्रित करेल. युट्यूबवर नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनप्रमाणे व्हिडिओ-स्ट्रीमिंग हब तयार करण्यात येणार आहे. हा कंटेट प्रेक्षक सबस्क्रिप्शनचे पैसे भरून पाहू शकतील.

‘द इन्फॉर्मेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, युट्यूब कंपनी जाहिरातींव्यतिरिक्त महसूल निर्माण करण्याचे नवीन मार्ग शोधत आहे. या अंतर्गत युट्यूब प्लॅटफॉर्मचा संपूर्ण लेआउट पुन्हा डिझाइन करण्याची योजना आखली जात आहे.

नव्याने डिझाइन केलेलं युट्यूब अ‍ॅप कसं असेल?

रिपोर्ट्सनुसार, युट्यूब अ‍ॅपचा लेआउट पुन्हा डिझाइन केला जाईल. आता या अ‍ॅपला नेटफ्लिक्स किंवा जिओस्टारसारखा लूक दिला जाऊ शकतो. यामध्ये विविध शो, सीरिज प्रदर्शित केल्या जातील. त्याचप्रमाणे, सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सला विविध सेवा दिल्या जातील. नव्या लेआऊटमध्ये निर्माते त्यांच्या शोचे एपिसोड आणि सीझनची झलक मुख्य पेजवर दाखवू शकतात. ही सुविधा युट्यूबवर सध्या उपलब्ध नाहीये. नवीन आलेल्या सीरिजची माहिती युट्यूबचं मुखपृष्ठ सुरू केल्यावर, लगेच समोर दिसल्यास प्रेक्षकांना त्यांचे आवडते शो पाहणं अधिक सोपं होईल. पुढील काही महिन्यांत वापरकर्त्यांना YouTube चा एक नवीन लूक पाहायला मिळेल.

YouTube जाहिराती दाखवण्याची पद्धत देखील बदलणार…

युट्यूबने म्हटलं आहे की, “१२ मे पासून युट्यूब व्हिडिओमध्ये नैसर्गिक ब्रेकपॉइंट्सवर जाहिराती दिसतील. याचा अर्थ असा की, सध्या, व्हिडिओच्या मध्यभागी कुठेही जाहिराती सुरू होतात. यात आता बदल करण्यात आला आहे. यापुढे, कंपनी कोणत्याही सीनदरम्यान किंवा डायलॉग कट करून जाहिराती दाखवणार नाही. यामुळे व्हिडिओ पाहताना युजर्सला कोणताही अडथळा येणार नाही.

आता, युट्यूब कंपनी सध्या हे अ‍ॅप वेगळ्या प्रकारे डिझाइन कसं करता येईल याबाबत योजना आखत आहे. जेणेकरून सगळे वापरकर्ते YouTube वरच सगळी माहिती शोधू शकतील आणि त्यांना इतर कोणतेही सबस्क्रिप्शन अ‍ॅप्स वापरावे लागणार नाहीत. तसेच या नव्या रीडिझाइनमुळे युट्यूब अ‍ॅप प्राइम व्हिडिओ किंवा अगदी डिस्ने प्लससारखं ( सध्याचं जिओस्टार ) होणार आहे.