Ranveer Allahbadia Controversy: सध्या लोकप्रिय युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया हा खूप चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्याच्यावर चहूबाजूने टीका होतं आहे. रणवीरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली असली तरी त्याच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहे. आता रणवीरच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर युट्यूबने मोठी कारवाई केली आहे.

रणवीर अलाहाबादियाचं वादग्रस्त वक्तव्य

अलीकडेच रणवीर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी झाला होता. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, तुला आयुष्यभर तुझ्या आई-वडिलांना सेक्स करताना पाहायला आवडेल? की तुला त्यांच्यात सामील होऊन ते थांबवायला आवडेल? रणवीरच्या याच आक्षेपार्ह वक्तव्यावर सध्या गदारोळ माजला आहे. ‘नॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन’मधील योगेंद्र सिंह ठाकूर यांनी रणवीर विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून समन्स बजावल्याचं समोर आलं आहे.

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mumbai police started inquiry to ranveer allahabadias and Samay Raina on obscene and controversial statement
Maharashtra Breaking News LIVE Updates : रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर शिवसेना खासदाराने लोकसभेत मांडला मुद्दा, ‘सेन्सॉर’ची केली मागणी!
Who Is Apoorva Makhija
Who Is Apoorva Makhija: फक्त रणवीर अलाहाबादियाच नाही तर अपूर्वा मुखिजानेही केली अश्लिल टिप्पणी; कोण आहे ‘द रिबल किड’?
stock market crash
Why market is falling today: सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी गायब, बाजार कोसळण्याची काय कारणं आहेत?
b praak and ranveer allahbadiya
“सनातनी धर्माचा प्रचार…”, प्रसिद्ध गायकाने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये जाण्यास दिला नकार; म्हणाला, “घाणेरडे विचार…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
rinku rajguru Krishnaraaj Dhananjay Mahadik photo from Mahalaxmi Temple Kolhapur
कृष्णराज महाडिक व रिंकू राजगुरूच्या कोल्हापुरातील फोटोची चर्चा, नेटकरी म्हणाले, “सैराट झालं जी…”

माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाला तपास आधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडायला सांगितलं आहे. त्यानंतर आता युट्यूबने कठोर पाऊल उचललं आहे. रणवीरने ज्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या भागात आक्षेपार्ह वक्तव्य केलं तो युट्यूबने हटवला आहे. आता तो व्हिडीओ युट्यूबवर दिसत नाहीये.

दरम्यान, रणवीर अलाहाबादिया माफी मागत म्हणाला होता की, मी ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये जे काही बोललो, ते मला बोलायला नव्हतं पाहिजे. मला माफ करा. माझ्याकडून चूक झालीये. मी त्या व्हिडीओमधून आक्षेपार्ह वक्तव्य हटवण्यास सांगितलं आहे. तुम्ही मला माफ कराल, अशी मला आशा आहे.

रणवीरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला ‘हा’ पुरस्कार

रणवीर अलाहाबादिया नावाजलेला युट्यूबर आहे. ‘बीयरबाइसेप्स मीडिया वर्ल्ड’चा तो संस्थापक आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. रणवीरचे ‘एक्स’वर सहा लाखांहून जास्त, इन्स्टाग्रामवर ४५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि युट्यूब चॅनेलवर १.०५ कोटींहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला गौरविण्यात आलं होतं. त्याला ‘डिसरप्टर ऑफ द इअर’ हा पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

Story img Loader