प्रसिद्ध यूट्यूबर जोरावर सिंग कलसीला अटक करण्यात आली आहे. जोरावर आणि त्याच्या एका मित्राला रील बनवल्याबद्दल तुरुंगात जावं लागलं आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. जोरावर व त्याच्या मित्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो लाखो लोकांनी पाहिला. या व्हिडीओत जोरावर त्याच्या मित्रासह गुरुग्राम डीएलएफ गोल्फकोर्सच्या अंडरपासमध्ये नोटा उडवताना दिसला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
‘नुक्कड’ गाजवणारा ‘खोपडी’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचं निधन
‘इंडिया डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूट्यूबर जोरावर सिंग कलसी आणि त्याच्या मित्राविरुद्ध सुशांत लोक पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलसीने २ मार्च रोजी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रील पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो शाहिद कपूर स्टारर ‘फर्जी’ या वेब सीरिजमधील एक सीन रिक्रिएट करत होता. आरोपी धावत्या बलेनो कारमधून बनावट नोटा फेकत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गोल्फ कोर्स रोडवर बनवण्यात आला आहे. अभिनेता शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ वेब सीरिजमध्ये शेवटी एक सीन होता, ज्यात त्याचा मित्र रस्त्याच्या मधोमध कारमधून बनावट नोटा उडवताना दिसत होता. हा सीन युट्यूबर व त्याच्या मित्राने रिक्रिएट केला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
रीलमध्ये दिसणारे आरोपी वेब सीरिजच्या पात्रांप्रमाणे एकमेकांना आवाज देत होते, असं तक्रारीत म्हटलं आहे. एसीपी विकास कौशिक यांनी सांगितलं की, यूट्यूबर जोरावर सिंग कलसी याला अटक करण्यात आली आहे. ती गाडीही जोरावर सिंग कलसीच्या नावावर आहे. तो दिल्लीतील टिळक नगरचा रहिवासी आहे. हा व्हिडीओ बनवण्यासाठी आरोपींनी बनावट नोटांचा वापर केला होता. २४ वर्षांचा जोरावर सिंग कलसी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्याचे युट्यूबवर साडेतीन लाख सब्सक्राइबर आहेत. तेवढेच फॉलोअर्स त्याचे इंस्टाग्रामवर आहेत.