सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची सगळीकडेच चर्चा आहे. फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून नवनवे इन्फ्लुएन्सर्स आपल्यासमोर येत असतात. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सोशल मीडियावरील या प्रसिद्ध लोकप्रिय इन्फ्लुएन्सर्सबरोबर एक सभा घेत त्यांना व त्यांच्या कामाला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशाच एका इन्फ्लुएन्सरला पुरस्कार देत सन्मानित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूट्यूबवरील ‘बीयर बायसेप’ या प्रसिद्ध चॅनलचा कर्ताधर्ता रणवीर अलाहबादीया याला पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते नुकताच ‘Disruptor of the Year’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रिएटर या कॅटेगरीमधला हा पहिलाच पुरस्कार भारत सरकारकडून देण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर इतरही क्षेत्रातील काही इन्फ्लुएन्सर्सलाही मोदींनी पुरस्कार देऊन प्रोत्साहित केलं.

आणखी वाचा : अनंत अंबानीचा ‘गॉडफादर’ कोण? मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा खुलासा

सोशल मीडिया, यूट्यूब आणि खासकरून पॉडकास्टच्या विश्वात रणवीर अलाहबादीया हे नाव चांगलंच मोठं आहे. मोठमोठे राजकारणी, खेळाडू, मोटीवेशनल स्पीकर्स, फिल्म सेलिब्रिटीज आणि इतरही बऱ्याच क क्षेत्रातील तज्ञांनी रणवीरच्या या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली आहे. रणवीरला फॉलो करणाऱ्या लोकांची संख्यादेखील चांगलीच मोठी आहे. याबरोबरच त्याच्या पॉडकास्ट शोवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या कामाला प्रोत्साहन देऊन त्यांना सन्मानित करण्यासाठी अशा प्रकारच्या नॅशनल क्रिएटर्स पुरस्कारांची सुरुवात केली असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिल्लीच्या भारत मंडपमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी रणवीरला पुरस्कार देताना नरेंद्र मोदी यांनी त्याची विनोदी शैलीत फिरकीही घेतली. मोदी यांनी रणवीरला “फिटनेसविषयी तरुणांना काय कानमंत्र देशील?” असा प्रश्न विचारला तेव्हा रणवीर म्हणाला, “मी लोकांना एकच गोष्ट सांगेन की त्यांनी योगा आणि मेडिटेशन याचा सराव करावा आणि त्यावर अधिक भर द्यावा.”

रणवीरच्या या उत्तरावर नरेंद्र मोदी म्हणाले, “असं केलं तर लोक म्हणतील की, तू मोदीजी यांची गोष्ट सांगत आहेस, तू बीजेपीवाला आहेस झाला आहेस असं लोक म्हणतील.” मोदीजी यांच्या या म्हणण्यावर रणवीर अलाहबादीया मनमुराद हसताना दिसला. या व्हिडीओवर बऱ्याच लोकांच्या मजेशीर कॉमेंट पाहायला मिळत आहेत.