विचारी, सर्जनशील व संवेदनशील व्यक्तींना आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपल्या अस्तित्वासंबंधीचे आणि एकूणच आपल्या जगण्यासंदर्भात, त्याच्या प्रयोजनाबद्दल प्रश्न पडत असतातच. विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत संत-महंत, महापुरुष, ऋषीमुनी, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि सर्जनशील माणसांना याच प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे. ‘मी कोण? माझ्या जगण्याचं प्रयोजन काय? विश्वाच्या जगड्व्याळ पसाऱ्यात माझं स्थान काय? अथांग ब्रह्मांडात ‘मी’ किती क्षुल्लक, नगण्य जीव आहे..’ या आणि अशा प्रश्नांचा भुंगा त्यांना कुरतडत राहतो. आणि त्यांची उत्तरं ही मंडळी आपापल्या परीनं शोधत असतात. मानवी अस्तित्वाबद्दलच्या या गूढ, अनाकलनीय प्रश्नांबद्दलचं त्यांचं चिंतन, मनन, संशोधन आणि अभ्यास यांतून त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं ते, ते आम लोकांसमोर ठेवतात. यातूनच अनेक ज्ञानशाखांचा जन्म झाला आणि त्या विकास पावल्या. असं जरी असलं, तरी या विश्वाचं कोडं अद्यापि माणसाला पूर्णत: उकललेलं नाही, हे वास्तव आहे. मानवी ज्ञानाच्या कक्षेपलीकडे अजूनही अशा असंख्य गोष्टी अस्तित्वात आहेत, ज्या हुडकून काढण्याचे माणसाचे प्रयत्न अविरतपणे सुरू आहेत. जो-तो आपापल्या परीनं हे गूढ उकलू पाहतो आहे. मानवजातीस पडणाऱ्या अशा प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरं मात्र वेगवेगळी असतात. अर्थात व्यक्तीपरत्वे तशी ती असणारच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा