माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखीने पती आणि नातेवाईकांविरुद्ध काही दिवसांपूर्वी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता.
आज सोमवारी युक्ताचे सासरे बच्चीतर सिंग (५९), सासू हरिंदर कौर टुली (६०), भावजय मनमीत कौर (३२) आणि दीर चंदन कौर (३४) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने काही वेळासाठी यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. न्यायालयाने या सर्वांच्या अटकेबाबत सुनावणी करताना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर यांची  सुटका केली आहे.

Story img Loader