टेलिव्हिजनवर सध्या टीआरपी यादीत अग्रस्थानी असलेला रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चा नववा सिझन लवकरच संपणार आहे. येत्या ७ नोव्हेंबरला या शोचा अंतिम भाग प्रसारित केला जाणार आहे. त्यापूर्वी ६ नोव्हेंबरच्या भागात क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री विद्या बालन या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या भागाचा प्रोमोसुद्धा वाहिनीकडून प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये कर्करोगाशी झुंज देतानाचा अनुभव सांगताना युवराज सिंगला अश्रू अनावर झाले.
‘२०११च्या विश्वचषकादरम्यान माझी प्रकृती खूपच खालावली होती. पण, अशातही मी जिद्दीने मैदानावर उभा राहिलो. १४ सेंटीमीटरचा ट्युमर होता. डॉक्टरांनी म्हटले होते की आता उपचार नाही केले तर तुला वाचवू शकणार नाही,’ असे सांगत असतानाच युवराजचे डोळे पाणावले. सूत्रसंचालन करत असलेले बिग बीसुद्धा यावेळी भावूक झाले.
Fighter @YUVSTRONG12
True Inspiration for millions
Keep Inspiring Us Champ br>We Love you so much Yuvipaa @hazelkeech @YWCFashion pic.twitter.com/j4RvPUid8g— Dream To meet YUVI (@yogivalavi) November 2, 2017
वाचा : सिद्धार्थ साकारणार कारगिलमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्याची भूमिका
६ आणि ७ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या या भागाला ‘अभिनंदन आभार’ असे नाव देण्यात आले आहे. या अंतिम भागासाठी ‘केबीसी’च्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला असून रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ७.३० वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.