भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमसंबंध आता सर्वज्ञात झाले आहेत. या दोघांनीही उघडपणे प्रेमाची कबुली दिली. यानंतर अनुष्काच्या दीराने आपल्या वहिनीची प्रशंसा करण्याची संधी दवडली नाही.
आता तुम्ही म्हणाल अनुष्काचा दीर तो कोण? तर क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या लाडक्या वहिनीची इन्स्टाग्रामवर प्रशंसा करणारी प्रतिक्रया टाकली होती. झाले असे की, अनुष्काने तिच्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता चित्रपटातील तिच्या काही छायाचित्रांचा कोलाज तयार करून इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला होता. त्यावर युवराजने, ‘ओए होए रोजी भाभी! ऑसम’ अशी प्रतिक्रिया टाकली होती. मात्र, अनुष्काने त्यावर काही बोलण्यापूर्वीच सदर प्रतिक्रिया काढून टाकण्यात आली.
anushka-yuvraj-comment
याआधीही वर्ल्ड कपच्या सेमीफायनमधील भारताच्या पराभवाला विराट-अनुष्काला जबाबदार ठरवलं जात होतं, तेव्हा त्यावेळी युवराजने या पराभवाला अनुष्काला जबाबदार धरलं जाऊ नये. असं म्हणत तिची पाठराखण केली होती. 

Story img Loader